हडपसर-पुणे (रोखठोक महाराष्ट्र ऑनलाईन न्युज)
पवारांनी बोटाला धरून राजकारण शिकवलं म्हणणाऱ्यांनी देशामध्ये भ्रष्टाचार माजवला आहे त्यामुळे पंतप्रधान समोर आल्यानंतर आम्ही हातात हात देत नाही तर हात जोडण्याचं काम करतो असा टोला माजी केंद्रीय कृषिमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मारला.
राफेल, नोटबंदी, काळा पैसा, 2 कोटी रोजगार यावर पवारांनी सडकून टीका केली.
शिरूर लोकसभा मतदार संघाचे राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस आघाडीचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांच्या प्रचारार्थ हडपसर येथे भव्य सभा आयोजित केली होती यावेळी मार्गदर्शन करताना श्री.पवार बोलत होते
विधानसभेचे माजी सभापती दिलीप वळसे पाटील, माजी राज्यमंत्री बाळासाहेब शिवरकर, राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्ष चेतन तुपे, राजलक्ष्मी भोसले, सुरेश घुले, प्रशांत जगताप, जालिंदर कामठे, योगेश ससाणे, आजी-माजी नगरसेवक व राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी मोठ्या संख्येने व्यासपीठावर उपस्थित होते.
पुढे बोलताना शरद पवार म्हणाले देशांमध्ये अराजकता माजवली आहे, नोटबंदी करून पंतप्रधान नरेंद्र मोदी परदेशात गेले व तेथे स्वतःची पाठ थोपटली मात्र देशातील जनतेला नोटबंदीमुळे प्रचंड मानसिक त्रास सहन करावा लागला, शेकडो मृत्यू झाले, छोटे व्यापार संपले काळा पैसा बाहेर काढण्याच्या वल्गना करणाऱ्यांनी मात्र कोणताही काळा पैसा परत आणला नाही रिझर्व बँकेच्या माजी गव्हर्नर व अधिकाऱ्यांनी या नोटबंदी वर टीका केली तसेच मनमोहनसिंग सरकारच्या काळात जी विमाने आम्ही घेणार होतो तीच विमाने महागड्या पैशात घेऊन मोठा भ्रष्टाचार विद्यमान केंद्र सरकारने केला आहे,
राफेल कराराची चौकशी करा कागदपत्रे जाहीर करा अशी मागणी केल्यावर ही कागदपत्रे गुप्त आहेत ते दाखवता येत नाही असे सांगून वेळ मारून नेतात मात्र प्रत्यक्षात कागदपत्रे चोरी गेली असे सांगतात यावरून सरकारचा खरा चेहरा जनतेसमोर आला आहे
नरेंद्र मोदी भाषणातून मोठ-मोठ्या विकासाची भ्रामक स्वप्न दाखवतात, प्रत्यक्षात मात्र देशात कोणताही विकास झाला नाही तर देशावर लाखो कोटी रुपयांचे कर्ज झाले आहे अशा भ्रष्ट सरकारला घरी बसण्याची वेळ आल्याचा इशाराही यावेळी पवार यांनी दिला.
यावेळी बोलताना उमेदवार डॉ.अमोल कोल्हे म्हणाले, विद्यमान खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी हडपसर विधानसभा मतदारसंघात उड्डाणपूल, भुयारी मार्ग केले नाहीत, वाहतुकीचे कोणतेही प्रश्न जे केंद्र सरकारच्या अंतर्गत येतात ते सोडविले नाहीत मात्र वेळोवेळी खोटी विधाने करून जनतेची दिशाभूल केली आहे असे सांगून राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस आघाडीचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे म्हणाले महिला मुले यांच्या स्वास्थ्यासाठी हडपसर मध्ये कोणत्या योजना राबवल्या नाही केंद्र सरकारच्या योजना राबवल्या नाही त्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड नाराजी आहे फक्त खोटी आश्वासने द्यायची भूल थापा मारायच्या यावर दहा वर्षे काढली आगामी काळात जनता तुम्हाला माफ करणार नाही तर चौकार मारायचं स्वप्न सोडाच तुम्हाला घरी बसावे लागेल अशा शब्दांत डॉ. कोल्हे यांनी खासदार आढळराव पाटील यांच्यावर टीका केली
माजी राज्यमंत्री बाळासाहेब शिवरकर यांनी चौफेर टोलेबाजी करीत आजच्या सभेत रंगत आणली, शरद पवार यांचे एवढे गुणगान केले की पवारांनी चिट्ठी पाठवून अमोल कोल्हे निवडणुकीत उभे आहेत मी नाही असे सांगितले त्यावर साहेब आपले कार्य हिमालय सारखे उतुंग आहे असे सांगून काँग्रेसने पूर्ण ताकद लावून हडपसर मधून मताधिक्य देण्याचे आवाहन केले.
शिरूर लोकसभा मतदारसंघात सर्वात जास्त मताधिक्य मिळवून देण्याचे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन तुपे यांनी केले.
यावेळी माजी महापौर प्रशांत जगताप, प्रशांत मामा तुपे, राजलक्ष्मी भोसले, जयदेव गायकवाड यांची भाषणे झाली
माझ्या कुटुंबाची काळजी मोदीने करू नये
नरेंद्र मोदी महाराष्ट्रात येतात व पवार कुटुंबियांच्या वर टीका करतात मला एकच मुलगी आहे ती पण स्वतंत्र संसार करत आहे तसेच लोकसभेत चांगला कारभार करत आहे, ज्यांना कुटुंब नाही ते टीका करतात, मोदींनी माझ्या कुटुंबाची काळजी करणे तर त्यांनी देशाला ज्या भ्रष्टाचाराच्या खाईत ढकलले आहे याची काळजी करावी असा चिमटा शरद पवार यांनी नरेंद्र मोदींना काढला
Sрot oⲟn with this write-up, Ӏ actually feel this amazing site needs far more
attention. I’ll probaƅly be back again to see more, thanks forr the information! https://de.warthunder.info/index.php?title=Agen_Slot777_:_Ultraslot777_%E2%80%93_Situs_Slot_Gacor_Online_Resmi_Dengan_Fasilitas_Paling_Memuaskan_Percuma_Teranyar
We are a group of volunteers and opening a new scheme in our community.
Your website provided us with valuable info to work on. You’ve done a formidable job and our
entire community will be thankful to you.
Incredible points. Solid arguments. Keep up the great effort.
El monitoreo de teléfonos celulares es una forma muy efectiva de ayudarlo a monitorear la actividad del teléfono celular de sus hijos o empleados.
I like this weblog very much, Its a rattling
nice place to read and incur information.Blog monetyze