पुणे

महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 1 ‘अ’ च्या पोटनिवडणुकीत भाजपच्या ऐश्वर्या जाधव विजयी

पुणे (रोखठोक महाराज ऑनलाईन न्यूज)
– पुणे महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 1 ‘अ’च्या पोटनिवडणुकीत आघाडीच्या रेणुका चलवादी यांना 4 हजार 85 तर, भाजपच्या ऐश्वर्या जाधव 7 हजार 180 यांना मतं मिळाली. या मातांच्या आकडेवारीनुसार ऐश्वर्या जाधव या तीन हजाराहून अधिक मतांनी विजयी झाल्या आहेत.

पुणे महानगरपालिकेच्या 2017 साली झालेल्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक 1 मधून भाजपच्या उमेदवार किरण जठार या विजयी झाल्या होत्या. मात्र, त्यांनी निवडणूक आयोगाकडे जे जात प्रमाणपत्र दाखल केले होते. ते अवैध असल्याची तक्रार निवडणूक आयोगाकडे करण्यात आली होती. त्या तक्रारीची दखल घेत. जात प्रमाणपत्रची तपासणी केल्यावर किरण जठार यांचे जात प्रमाणपत्र अवैध असल्याचा निर्णय देण्यात आला. त्यानंतर निवडणूक आयोगाने प्रभाग क्रमांक 1 ची पोटनिवडणूक जाहीर केली.

या निवडणुकीत आघाडीकडून रेणुका चलवादी 4 हजार 85, भाजपकडून ऐश्वर्या जाधव 7 हजार 180आणि वंचित आघाडीच्या रोहिणी टेकाळे 2 हजार 344 उमेदवार होत्या. एकूण मतदार 68 हजार 346 त्यापैकी 15 हजार 225 या आकडेवारीवरून 22.05 टक्के इतके मतदान झाले. मतदानाला काही तास होत नाही. तोवर आज सकाळी मतमोजणीला सुरुवात झाली.

आघाडीकडून रेणुका चलवादी आणि भाजपकडून ऐश्वर्या जाधव यांच्यात स्पर्धा पाहण्यास मिळाली. तर, पाहिल्या फेरीपासून अखेरच्या फेरीपर्यंत भाजपच्या उमेदवार ऐश्वर्या जाधव याच आघाडीवर होत्या. या रेणुका चलवादी 4 हजार 85, भाजपकडून ऐश्वर्या जाधव 7 हजार 180आणि वंचित आघाडीच्या रोहिणी टेकाळे 2 हजार 344 या मातांच्या आकडेवारीनुसार ऐश्वर्या जाधव या 3 हजार हून अधिक मतांनी विजयी झाल्या आहे.

0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
1 Comment
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments
1 day ago

discord csgo

Comment here

1
0
Would love your thoughts, please comment.x
()
x