शिरुर

जेव्हा कट्टर प्रतिस्पर्धी समोरासमोर येतात तेव्हा…खा.आढळराव पाटील अन अमोल कोल्हे भेट, दोघात हस्तांदोलन, बापटांची मिठी

io

तुळापूर (रोखठोक महाराष्ट्र ऑनलाईन न्युज):- छत्रपती संभाजी महाराजांच्या पुण्यतिथी निमित्त शिरुर लोकसभा निवडणुकीतील प्रतिस्पर्धी उमेदवारांची भेट घडली. शिवसेनेचे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यावेळेस विजयाचा चौकार मारण्याच्या तयारीत आहेत. तर राष्ट्रवादीने डॉ.अमोल कोल्हे यांना उमेदवारी देऊन त्यांच्यापुढे कडवे आव्हान उभे केले आहे. त्यामुळेच या लढतीकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.

शिरूर लोकसभेच्या रणसंग्रामात शिवसेनेचे विद्यमान खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांना सेना-भाजप युतीकडून पुन्हा उमेदवारी देण्यात आली आहे. तर राष्ट्रवादीच्या तिकीटावर प्रसिद्ध अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांना शिरुरच्या मैदानात उतरवले आहे. आज छत्रपती संभाजी महाराजांची पुण्यतिथी असल्यामुळे तुळापूर येथे शंभू भक्तांनी मोठी गर्दी केली आहे. त्यात सर्वच पक्षाचे उमेदवार आणि नेते छत्रपती संभाजी महाराजांना आदरांजली वाहायला तुळापूर येथे येत आहेत. तुळापूरमध्येच शिवाजीराव आढळराव पाटील आणि अमोल कोल्हे यांची भेट घडली. यावेळी शिवाजीराव आढळराव पाटील आणि अमोल कोल्हे यांनी हस्तांदोलन देखील केले.

 

पुण्याचे पालकमंत्री आणि भाजप उमेदवार गिरीश बापट यांनीही कोल्हेंची गळाभेट घेतली.
डॉ. अमोल कोल्हे सध्या ‘झी मराठी’ वाहिनीवर स्वराज्यरक्षक संभाजी या मालिकेत संभाजी महाराजांची भूमिका साकारत असल्यामुळे त्यांना पाहण्यासाठी, त्यांचे फोटो काढण्यासाठी उपस्थितांनी त्यांच्या भोवती मोठी गर्दी केली होती.

0 0 votes
Article Rating
197 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments