पुणे

कर्मवीर रयत मॅरेथॉनचे आयोजन, स्पर्धकांचा प्रचंड प्रतिसाद

पुणे २७ : (रोखठोक महाराष्ट्र न्युज ऑनलाईन)
रयत शिक्षण संस्थेच्या पश्चिम विभागाच्या वतीने रविवार दिनांक २९ डिसेंबर, २०१९ रोजी सकाळी ७.०० वाजता एस. एम. जोशी कॉलेज येथून कर्मवीर रयत मॅरेथॉनचा प्रारंभ होणार आहे. सदर कार्यक्रमास मा. माजी विधानसभा अध्यक्ष आमदार दिलीपरावजी वळसे पाटील, मा.उपमुख्यमंत्री आमदार अजितदादा पवार, नोबल हॉस्पिटलचे संस्थापक डॉ. दिलीप माने, उद्योजक मा. दशरथ जाधव, राष्ट्रीय कुस्तीपटू ,कु. अनुष्का हास्पे तसेच मा. आमदार चेतनदादा तुपे, मा. दिलीपआबा तुपे, मा. सदाशिवबापू सातव, मा. भगवानराव बेंडे पाटील, मा. डॉ. दिगंबर दुर्गाडे, मा. रुपालीताई चाकणकर, मा. अशोकआप्पा तुपे, मा. निरंजन केळशीकर, मा. संदीप पवार इत्यादी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. सदर मॅरेथॉनचा बक्षीस वितरण समारंभ एस.एम.जोशी महाविद्यालयातील इनडोअर स्टेडीयममध्ये सकाळी ९.०० वाजता संपन्न होणार आहे, अशी माहिती रयत शिक्षण संस्थेच्या पश्चिम विभागाचे अध्यक्ष अॅड. राम कांडगे तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अरविंद बुरूंगले यांनी दिली. या मॅरेथॉनमध्ये एकवीस हजार विद्यार्थी सहभागी होणार असून या कर्मवीर रयत मॅरेथॉनची स्लोगन “ रन फॉर वुमेन्स सेफ्टी ” अशी आहे.

Facebook Page

https://m.facebook.com/story.php?story_fbid=115380529966044&id=112080646962699

0 0 votes
Article Rating
4 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments