#टिकटॉकचं_व्यसनच_लागल्यामुळे_पतीने_कोर्टाकडे_केली_घटस्फोटाची_मागणी

Rokhthok Maharashtra 1 121

#रोखठोक_महाराष्ट्र_न्यूज_ऑनलाईन

नवी दिल्ली | ‘टिकटॉक’चं वेड आजकाल सर्वांनाच लागल्याचं पाहायला मिळतंय. गाझियाबादमधील एका महिलेला टिकटॉकचं व्यसनच लागलं. त्यामुळे तिच्या पतीने घटस्फोटाची मागणी करत कोर्टात धाव घेतली आहे.

गाझियाबादमधील एका व्यावयिकाचं लग्न २०१९ साली एका तरुणीशी झालं. तिला लग्नापासूनच टिकटॉकवर व्हिडीओ बनवण्याची सवय होती. लग्नानंतरही तिची सवय गेली नाही. याउलट तिने आपल्या नवऱ्याची बहिण आणि भावालाही याची सवय लावली, असा आरोप तिच्या नवऱ्याने केला आहे.

संबंधित महिलेच्या त्रासाला कंटाळून त्याने आपल्या आई-वडिलांना तिच्या सवयीबद्दल सांगितलं तर त्यांनी चक्क तिला पाठराखण केली. तिला समजवण्याचा प्रयत्न केला तर ती नेहमी भांडायची. टिकटॉकमुळे स्वयंपाक करायला वेळ लावायची, अशी तक्रार संबंधित पतीने केली आहे.

पत्नीला टिकटॉकचं व्यसन लागल्याने पतीपासून घटस्फोट द्यावा, अशी मागणी त्याने न्यायालयाकडे केली आहे. दरम्यान, टिकटॉक मोबाईल अ‌ॅपमुळं अनेकांच्या संसाराची घडी मोडल्याच्या घटना घडल्या आहेत.

0 0 votes
Article Rating
121 Comments
Oldest
Newest Most Voted

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.