पुणे : अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांची फिल्म फेडरेशन ऑफ इंडियाच्या उपाध्यक्ष पदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे. फिल्म फेडरेशन ऑफ इंडियाच्या गोवा येथे झालेल्या बैठकीत ही निवड करण्यात आली असून फेडरेशनच्या अध्यक्षपदी प्रसिद्ध चित्रपट निर्माते टी. पी. अग्रवाल यांची निवड करण्यात आली आहे. फिल्म फेडरेशन ऑफ इंडिया ही देशभरातील प्रादेशिक व राष्ट्रीय पातळीवर काम करणाऱ्या विविध संघटनांची शिखर संस्था आहे. आज गोवा येथे देशभरातील विविध संघटनांच्या अध्यक्ष व प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत मेघराज राजेभोसले यांची उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे. अखिल भारतीय मराठी चित्रपट ही देशातील सर्वाधिक सदस्य संख्या असलेली प्रमुख संस्था आहे. राजेभोसले यांची उपाध्यक्ष पदी बिनविरोध निवड झाल्याने मराठी चित्रपटसृष्टी आणि अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या शिरपेचात मानात आणखी एक तुरा रोवला गेला आहे.
मेघराज राजेभोसले यांची फिल्म फेडरेशन ऑफ इंडियाच्या उपाध्यक्ष पदी बिनविरोध निवड
November 20, 20210

Related Articles
April 3, 20250
फॅशन जगतासाठी भारत मोठी बाजारपेठ – वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे स्कूल ऑफ फॅशन टेक्नॉलॉजीचा पदवी प्रदान सोहळा संपन्न
पुणे, दि. ३: फॅशन जगतासाठी भारत ही जगातील सर्वात मोठी बाजारपेठ असून येथील परं
Read More
February 17, 20210
बेकायदेशीर गावठी पिस्टल बाळगणाऱ्या आरोपीसह तडीपार आरोपी जेरबंद – हडपसर पोलिसांची धडाकेबाज कामगिरी
पुणे /हडपसर (विशेष क्राईम प्रतिनिधी)
बेकायदेशीररित्या गावठी बनावटीचे पिस्
Read More
June 25, 20230
महावितरण चे विजेचे खांब बनले केबलधारकांचे कमाईचे साधन विनपरवाना खांबाचा वापर, “कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे” अशी परिस्थिती…!
प्रतिनिधी: रमेश निकाळजे
सध्या पुणे शहर आणि शहराच्या आजूबाजूचा परिसर फार झ
Read More