राज्यातील माध्यमिक शाळांमधील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नांबाबत आज सोमवार दिनांक २०/०६/२०२२ रोजी मंत्रालय, मुंबई येथे शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू साहेब यांच्या अध्यक्षतेखाली शिक्षण विभागातील अधिकारी व शिक्षकेतर महामंडळ पदाधिकारी यांची बैठक संपन्न झाली. या सभेमध्ये शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या पदोन्नती बाबत राज्यामध्ये एकसारखेपणा असावा व ज्या जिल्ह्यामध्ये पदोन्नती दिली जात नाही त्या जिल्ह्यातील संबंधित अधिकारी यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशा प्रकारचा निर्णय घेण्यात आला. त्याचबरोबर १०,२०,३० वर्षाच्या सेवेनंतर देण्यात येणाऱ्या वरच्या श्रेणी बाबत या विषयाच्या अनुषंगाने शालेय शिक्षण विभागाने प्रस्ताव वित्त विभागाकडे सादर केला आहे. त्याचा पाठपुरावा करण्यात येईल, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना न्याय देण्याचा प्रयत्न चालू आहे. व याबाबत सभागृहांमध्ये दिलेले आश्वासन पूर्ण करीन असे बच्चुभाऊ कडू यांनी सांगितले.याचबरोबर चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांच्या अनुकंपा बाबतचा शासन निर्णय लवकरात लवकर निर्गमित होण्यासाठी शालेय शिक्षण विभागाचे उपसचिव मा. समीर सावंत सर यांना सूचना देण्यात आल्या. या सभेसाठी शालेय शिक्षण राज्यमंत्री यांचे ओ. एस. डी. विजय बोरसे यांचे अतिशय मोलाचे योगदान लाभले अशी माहिती शिक्षकेतर महामंडळाची राज्य सरकार्यवाह शिवाजी खांडेकर यांनी दिली.
शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नांबाबत लवकरच तोडगा काढू….. शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू
June 20, 20220

Related Articles
June 28, 20200
Rokhthok_Big_Breking_News प्रेम पडले महागात.. ‘तो’ प्रियसीसोबत ‘गुलू-गुलू’ करायचा, लग्नाचं आमिष दाखवून 27 लाख हडपले
खालापूर : - प्रेयसीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्याकडून तब्बल 27 लाख रुपये आणि
Read More
August 23, 20220
नव्या सूर्याची नवी किरणं गाठीशी बांधूया छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र नव्याने घडवूया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शेतकऱ्यांना पत्राद्वारे भावनिक साद
[4:08 pm, 23/08/2022] +91 94040 45604: पुणे, दि. २३: मेजर ध्यानचंद यांचा २९ ऑगस्ट हा जन्म दिन राष्ट्री
Read More
July 11, 20230
शासनाच्या शंकरराव चव्हाण पत्रकार कल्याण निधी समितीवर राजा माने
मुंबई,दि. पत्रकारांच्या विविध समस्या सोडविण्यासाठी कार्यरत असलेल्या महार
Read More