मुंबई

प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यभर आठशे पिशव्या रक्त संकलन महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या वतीने रक्तदानाचा विक्रम

मुंबई(प्रतिनिधी)- महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यभरात विविध ठिकाणी पत्रकारांनी रक्तदान शिबीरांचे आयोजन करत तब्बल 823 पिशव्यांचे संकलन करुन विक्रम नोंदवला. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या रक्तदानाच्या आवाहनाला राज्य पत्रकार संघाने प्रतिसाद देत नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच महारक्तदान करत कोरोना काळात सामाजिक दायीत्वच निभावले. पहिल्यांदाच राज्यभर पत्रकारांनी एकाच दिवशी रक्तदान करण्याचा संकल्प यशस्वी केला. याबद्दल पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे व राज्य संघटक संजय भोकरे यांनी समाधान व्यक्त केले असल्याची माहिती प्रदेश सरचिटणीस विश्‍वास आरोटे यांनी दिली.
मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोरोना काळात मोठ्या प्रमाणात रक्ताचा तुटवडा निर्माण झाल्याने संघटना, नागरिकांनी जास्तीत जास्त रक्तदान करावे असे आवाहन केले होते. मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे राज्य संघटक संजय भोकरे यांच्या सुचनेनुसार प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे व प्रदेश सरचिटणीस विश्‍वास आरोटे यांच्या वाढदिवसानिमित्त 1 जानेवारी 2021 रोजी संघाच्या पदाधिकार्‍यांनी राज्यभर भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन करुन स्वतःही रक्तदान करावे असे आवाहन केेले होते. नवीन वर्षाची सुरुवात पत्रकार संघाच्या पदाधिकार्‍यांनी वेगवेगळ्या ठिकाणी स्थानिक संस्था, आरोग्य प्रशासन यांच्या सहकार्यातून मोठ्या प्रमाणावर रक्तदान शिबीर आयोजित करुन आठशे पेक्षा जास्त रक्त पिशव्यांचे संकलन करण्याचा विक्रम केला. राज्य संघटक संजय भोकरे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाध्यक्ष रविंद्र कांबळे यांनी सांगली येथे अंबाबाई तालीम शिक्षण संस्थेतील वृत्तपत्र महाविद्यालयात रक्तदान शिबीरात 42 पिशव्या रक्त संकलन केले. तर नाशिक जिल्हाध्यक्ष लक्ष्मण डोळस आणि शहराध्यक्ष दिलीप कोठावदे यांच्या नेतृत्वाखाली 114 पिशव्या रक्त. तर गोवा राज्याचे संपर्क प्रमुख शिवाजी नेहे यांनी श्री स्वामी समर्थ मठ शिवोली यांच्या संयुक्त विद्यमाने सर्वाधिक 125 पिशव्या रक्त संकलन केले. सोलापूरमध्ये जिल्हाध्यक्ष मनिष केत यांनी 51 तर सतिश सावंत यांंच्या नेतृत्वाखाली 60 अशा 111 पिशव्या रक्त संकलन झाले. अहमदनगर जिल्हाध्यक्ष दत्ता पाचपुते व अनिल रहाणे, राज्य माध्यम समन्वयक भगवान राऊत यांनी तीन ठिकाणी रक्तदान शिबीरातून 94 रक्त पिशव्यांचे संकलन केले. उत्तर महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष प्रविण सपकाळे आणि खान्देश विभागीय अध्यक्ष किशोर रायसाकडा यांच्या नेतृत्वाखाली जळगाव जिल्ह्यात 51 पिशव्यांचे रक्त संकलन झाले. विदर्भात विभागीय अध्यक्ष महेश पानसे यांच्या नेतृत्वाखाली गोंदिया मध्ये जिल्हाध्यक्ष राधेशाम भेंडारकर यांच्या पुढाकारातून 54 पिशव्या रक्त. तर बुलढाणा जिल्हाध्यक्ष प्रा.सुभाष लहाने व शहराध्यक्ष पृथ्वीराज चव्हाण यांनी 11 पिशव्या रक्त संकलन केले. मराठवाडा विभागीय अध्यक्ष वैभव स्वामी यांच्या नेतृत्वाखाली परभणी जिल्हाध्यक्ष विजय चव्हाण यांनी रक्तदान शिबीरातून 50 पिशव्या रक्त तर औरंगाबाद विभागीय कार्यालयात जिल्हाध्यक्ष प्रा.डॉ.प्रभू गोरे आणि शहराध्यक्ष अनिल सावंत यांनी शिबीरातून 43 पिशव्या रक्त संकलन केले. बीड येथे जिल्हाध्यक्ष वैभव स्वामी यांनी रक्तदान शिबीरात 23 पिशव्या. तर लातूर जिल्हाध्यक्ष अशोक देडे यांनी 25 पिशव्या आणि जालना जिल्हाध्यक्ष दिगांबर गुजर यांनी 80 पिशव्या रक्त संकलन केले. राज्यात पहिल्यांदाच पत्रकारांनी रक्तदान शिबीराचे आयोजन करुन एकाच दिवशी आठशे पेक्षा जास्त पिशव्या रक्त संकलन करण्याचा विक्रम नोंदवला. राज्य पत्रकार संघाच्या आवाहनाला प्रतिसाद देत पदाधिकार्‍यांनी मोठ्या प्रमाणात रक्तदान करुन सामाजिक जाणीव ठेवल्याबद्दल संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे व राज्य संघटक संजय भोकरे यांनी समाधान व्यक्त केले असल्याची माहिती प्रदेश सरचिटणीस विश्‍वास आरोटे यांनी दिली.
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
0 Comments
Inline Feedbacks
View all comments

Comment here

0
Would love your thoughts, please comment.x
()
x