पुणे

पुण्यातील पाषाण भागात अल्पवयीन मुलीला अंगावर ऍसिड टाकून जीवे मारण्याची धमकी, तरुणाविरोधात गुन्हा दाखल…!

पुणे: प्रतिनिधी ( रमेश निकाळजे )

पाषाण भागातील एका हॉटेलमध्ये मित्रमैत्रिणींसोबत वाढदिवस साजरा करणाऱ्या अल्पवयीन युवतीला एकतर्फी प्रेमातून अंगावर ऍसिड टाकून जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याची घटना आज घडली, याबाबत एका युवतीने चतुःशृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे, युवतीला जीवे मारण्याची धमकी दिल्या प्रकरणी अमोल नवगिरे नामक मुलाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे,आरोपी अमोल हा युवतीच्या ओळखीचा आहे असे समजते.

पाषाण भागातील एका हॉटेलमध्ये युवती मैत्रिणींसोबत वाढदिवस साजरा करण्यासाठी गेली होती,त्या वेळी अमोल हॉटेलमध्ये आला, त्याने मित्रमैत्रिणींसोबत वाढदिवस साजरा करणाऱ्या युवतीला धमकावले. ‘तू जर माझी नाही झाली तर कोणाचीही होणार नाही’, अशी धमकी त्याने दिली,युवतीच्या चेहऱ्यावर ऍसिड फेकण्याची धमकी दिली,तसेंच हॉटेलमध्ये युवतीशी असभ्य वर्तन केले, त्यानंतर अमोल पसार झाला,या प्रकारामुळे घाबरलेल्या युवतीने पोलिसांकडे तक्रार दिली असून पोलीस उपनिरीक्षक चाळके पुढील तपास करत आहेत.

दरम्यान, औंध परिसरात एकतर्फी प्रेमातून तरुणीचा खून केल्याची घटना गेल्या महिन्यात घडली होती, श्वेताचा खून करून पसार झालेल्या प्रतीक ढमाले याने मुळशी धरण परिसरात झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली होती तसेच प्रभात रस्ता परिसरात एका तरुणीचा पाठलाग करून तिच्या चेहऱ्यावर ऍसिड फेकण्याची घटना नुकतीच घडली होती त्यात काल घडलेल्या या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.