पुणे

पत्नी व पत्नीच्या माहेरच्या लोकांकडून होणाऱ्या त्रासाला कंटाळून, पतीची आत्महत्या मुंढवा येथील धक्कादायक प्रकार,

प्रतिनिधी- स्वप्नील कदम

पुणे – मुंढवा येथे पत्नी व तिच्या माहेरकडील लोकांच्या त्रासाला कंटाळून पतीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना मुंडवा परिसरात घडली आहे. याप्रकरणी पत्नीसह चौघांवर मुंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सौरभ झा ( वय ३१) असे आत्महत्या केलेल्या इसमाचे नाव आहे.
याप्रकरणी सौरभ ची आई शामल किशोर झा (वय ५९) रा. लोहगाव, पुणे, यांनी मुंढवा पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार पत्नी, मेव्हणा, मेहुण्याची पत्नी, आणि सासरे, (सर्व रा. बिहार) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सौरभ झा यांना बेंगलोर येथे फ्लॅट घेण्यावरून झालेल्या वादातून पत्नी आणि तिच्या कुटुंबीयांनी शिवीगाळ करत मारहाण केली होती. त्यामुळे सौरभचे मानसिक संतुलन बिघडले होते. त्यानंतर सौरभ याने पत्नी आणि तिच्या कुटुंबाकडून होणाऱ्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केली. याप्रकरणी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली होती.
मात्र फिर्यादी यांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी चार जणांविरुद्ध आयपीसी, ३०६,३४ नुसार गुन्हा दाखल केला आहे.