पुणे

पुणे-सोलपुर महामार्गावर उरुळीकांचन नजीक एस टी व मोटरसायकल अपघातात २३ वर्षीय तरुण जागीच ठार…!

पुणे: प्रतिनिधी( रमेश निकाळजे )

पुणे- सोलापूर महामार्गावरील दौंड तालुक्यातील सहजपूर गाव ग्रामपंचायत हद्दीत एसटी व दुचाकी यांच्या मध्ये झालेल्या भिषण अपघातात २३ वर्षीय तरुण जागेवरच ठार झाल्याची घटना मंगळवार (ता. २७) दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे.

हर्षद अनिल पांगारकर (वय २३, रा. पांगारे वस्ती, सहजपुर, ता. दौंड) मला अपघातात ठार झालेल्या तरुणाचे नाव आहे, अपघात स्थळी उपस्थित असणाऱ्या लोकांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पुणे- सोलापूर महामार्गावरून हर्षद हा उरुळी कांचन (ता. हवेली) या ठिकाणी दुचाकीवरून निघाला होता. यावेळी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास हर्षद हा सहजपुर ग्रामपंचायत हद्दीतील सहजपुर फाट्यावरून एस टी बसच्या पुढे जाण्याचा ओव्हर टेक करीत होता हर्षद चालवित असलेल्या दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने तो थेट एस. टी. च्या पाठीमागील चाकाच्या खाली त्याची दुचाकी गेल्याने त्याचा जागेवरच मृत्यू झाला.

दरम्यान, सदर घटनेची माहिती मिळताच उरुळी कांचन येथील कस्तुरी प्रतिष्ठाणच्या सदस्यांनी तात्काळ रुग्णवाहिका उपलब्ध करून दिली, त्यानुसार त्याला ग्रामीण रुग्णालय यवत या ठिकाणी उपचारासाठी दाखल केले मात्र डॉक्टरांनी उपचारापूर्वीच निधन झाल्याची माहिती दिली, घटनास्थळी यवत पोलीस दाखल झाले असून पुढील तपास सुरू आहे.