पुणे

धक्कादायक बातमी ! किरकोळ कारणावरून पुण्यातील तरुणाला पानशेतजवळ डोक्यात लोखंडी रॉडने जबरदस्त मारहाण, मारहाणीत तरुणाचा मृत्यू…!

पुणे:प्रतिनिधी( रमेश निकाळजे )

किरकोळ वादातून पुण्याच्या अप्पा बळवंत चौकातील कन्या शाळेजवळील विजय लॉज जवळील बिल्डींगमध्ये राहणाऱ्या युवकाचा पानशेतजवळील आंबीगाव रस्त्यावरील कुरण गावच्या हद्दीतील रानवडी येथे लोखंडी रॉड मारून खून करण्यात आला आहे, पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह घराच्या बांधकामासाठी खोदण्यात आलेल्या एका खोल खड्डयात पुरण्यात आला, मात्र, ही धक्कादायक घटना वेल्हे पोलिसांच्या सतर्कतेमुळे उघडकीस आली आहे.

विजय प्रफुल्ल काळोखे असे खून झालेल्याचे नाव आहे, याप्रकरणी वेल्हे पोलिसांनी नितीन रामभाऊ निवंगुणे आणि विजय दत्तात्रय निवंगुणे यांना अटक केली आहे,तसेंच त्यांच्याविरूध्द वेल्हे पोलिस ठाण्यात खून, खुनाचा पुरावा नष्ट करणे आणि इतर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे, ही घटना दि. 13 रोजी दुपारी दोन ते दि. 14 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजण्याच्या दरम्यान घडली आहे, यासंदर्भात पोलिस नाईक अजयकुमार शिंदे यांनी फिर्याद दिली आहे.

नितीन निवंगुणे आणि विजय निवंगुणे यांनी एकाचा खून केला असून त्याचा मृतदेह त्यांनी नितीनच्या शेतातील खड्ड्यात पुरून टाकल्याची माहिती पोलिसांना खबऱ्याकडून मिळाली होती, त्यामुळे प्रकरणाची सखोल चौकशी करून पोलीसी खाक्या दाखवल्यावर दोघांनी मिळून विजय काळोखे याचा खून आपणच केल्याचे कबूल केले, त्यामुळे पोलिसांनी दोघांना अटक केली असल्याचे सांगितले आहे, पुढील तपास वेल्हे पोलीस करत आहेत.