Uncategorized

शिवसेना उपनेत्या शितल म्हात्रे यांचा बदनामीकारक मॉर्फिंग व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल – दोषींवर कडक कारवाई करा – शहरप्रमुख प्रमोद नाना भानगिरे

पुणे (प्रतिनिधी)
शिवसेना उपनेत्या शितल म्हात्रे यांच्यावर आक्षेपार्ह पोस्ट कमेंट व मॉर्फ व्हिडिओ टाकणाऱ्या संबंधितांवर तात्काळ कारवाई करण्यासाठी आज शिवसेना पक्षाचे पुणे शहर प्रमुख प्रमोद नाना भानगिरे स्वारगेट पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाले होते.

यावेळी शिवसेना उपनेत्या शितलताई म्हात्रे यांच्या बदनामीचा कट करणाऱ्या आणि आक्षेपार्ह मजकूर टाकणाऱ्या
फेसबुक अकाउंट वर तात्काळ कारवाई करण्यात यावी आणि त्यासंबंधीचे दोषी आढळलेल्यांवर न्यायालयीन
प्रक्रिया राबवून आयपीसी कलम 354, 471, 509, 499, 500 अंतर्गत योग्य ती कारवाई करण्याबाबत स्वारगेट पोलीस स्टेशनला निवेदन देण्यात आले यावेळी शहरप्रमुख प्रमोद नाना भानगिरे, पुणे उपशहर प्रमुख सुधीर कुरुमकर व मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते.

सोशल मीडियावर व्हिडीओ मध्ये फेरफार करून आमदार असणाऱ्या महिलेचा अवमान करण्यात आला आहे, हा सोशल मीडियाचा गैरवापर आहे, अशा समाजकंटकांवर कडक कारवाई झाली पाहिजे याकरिता पोलीस स्टेशनला निवेदन दिले आहे, कडक कारवाई झाली नाही तर तीव्र आंदोलन करण्यात येईल.
प्रमोद नाना भानगिरे
शहरप्रमुख – शिवसेना पुणे