पुणे

स्पंदन शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य, ऑक्यूपेशन थेरपी, फ़िजिओथेरपी आणि स्पीच थेरपी सेटअप वितरण संपन्न

दिपक वेल्फेअर फाऊंडेशन आयोजित स्पंदन स्पेशल स्कूल आणि पुनर्वसन केंद्र, पुणे येथे नुकताच विशेष विद्यार्थ्यांच्या दृष्टीने प्रेरणा प्रकल्पाच्या अंतर्गत नवीन तंत्रज्ञान आत्मसात करून उज्ज्वल भविष्य निर्माण करण्यासाठी व विद्यार्थ्याचा बौद्धिक क्षमतेचा उचांक वाढवण्यासाठी उपयोगी होतील अश्या शैक्षणिक साहित्य, ऑक्यूपेशन थेरपी, फ़िजिओथेरपी आणि स्पीच थेरपी सेटअप वितरण समारंभ पार पडला.

  स्पंदन शाळेमधील या विशेष विद्यार्थ्यांना या अद्यावत तंत्रज्ञानाच्या सहकार्याने व कार्यक्षमतेच्या जोरावर नक्कीच एक दिवस समाजामध्ये आपले एक वेगळे स्थान निर्माण करू शकतील व स्वबळावर सर्व सामन्याप्रमाणे  येणाऱ्या अनेक संधी साध्य करतील असा मला विश्वास वाटतो असे उदगार या प्रसंगी अध्यक्षपदावरून बोलताना जॉन्सन कंट्रोल्स इंडिया प्रा. लि. चे, वित्त संचालक (APAC) शशांक भटनागर यांनी काढले.

या वेळी जॉन्सन कंट्रोल्स इंडिया प्रा. लि. चे, वित्त संचालक (APAC) श्री शशांक भटनागर, तसेच भारतीय बहुउद्देशीय खादी व ग्रामोद्योग शिक्षण संस्थेचे प्रकल्प संचालक प्रकाश जगताप तसेच जॉन्सन कंट्रोल्स इंडिया प्रा. लि. चे पदाधिकारी श्री राजर्षी दत्ता, प्रशांत मोहिते, संतोष जगताप, श्रीमती राखी त्यागी तसेच स्पंदन शाळेच्या मुख्यध्यापिका श्रीमती माधुरी गाडेकर उपस्थित होत्या.

समाजाचा विशेष व्यक्तींकडे पाहण्याचा दृष्टीकोन हा सकारात्मक स्वरुपात बदलणे गरजेचे असल्याचे हि त्यांनी नमूद केले. तसेच शाळेतील विद्यार्थी या  शैक्षणिक साहित्य, ऑक्यूपेशन थेरपी, फ़िजिओथेरपी आणि स्पीच थेरपी सेटअपच्या मदतीने उत्तम दर्जाचे बौद्धिक शिक्षण प्राप्त करून नक्कीच स्वतःचा व देशाचा विकास घडवून आणतील असे मत हि जॉन्सन कंट्रोल्स इंडिया प्रा. लि. चे प्रकल्प वित्त संचालक (APAC) शशांक भटनागर यांनी व्यक्त केले.

हडपसर मधील स्पंदन शाळेमध्ये जॉन्सन कंट्रोल्स इंडिया प्रा. लि. यांच्या सी एस आर च्या प्रेरणा  प्रकल्प अंतर्गत व भारतीय बहुउद्देशीय खादी व ग्रामोद्योग शिक्षण संस्थेच्या सहकार्याने शाळेतील विशेष विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्य, ऑक्यूपेशन थेरपी, फ़िजिओथेरपी आणि स्पीच थेरपी सेटअपचे वितरण करण्यात आले.

या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना भारतीय बहुउद्देशीय खादी व ग्रामोद्योग शिक्षण संस्थेचे प्रकल्प संचालक प्रकाश जगताप म्हणाले की, विशेष विद्यार्थी या समाजाच्या मुख्य प्रवाहातील एक महत्वाचा घटक असून या विद्यार्थ्यांकडे आणि त्यांच्या व्यक्तिमत्वाकडे पाहिल्यास विलक्षण विभूतीचा साक्षात्कार झाल्याशिवाय राहत नाही. या विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी हडपसर येथील स्पंदन शाळा  येथे राबवीत असलेले नाविन्यपूर्ण उपक्रम या करीता भारतीय बहुउद्देशीय खादी व ग्रामोद्योग शिक्षण संस्थेचे नेहमी सहकार्य मिळेल.

याप्रसंगी जॉन्सन कंट्रोल्स इंडिया प्रा. लि. च्या श्रीमती राखी त्यागी,  प्रशांत मोहिते, शाळेतील विद्यार्थ्यांचे पालक यांची मनोगते झाली. कार्यक्रमादरम्यान पाहुण्यांचे स्वागत व प्रस्ताविक भारतीय बहुउद्देशीय खादी व ग्रामोद्योग शिक्षण संस्थेचे अक्षय राऊत यांनी केले व पांडुरंग गाडेकर यांनी शाळेच्या वतीने आभार मानले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी  भारतीय बहुउद्देशीय खादी व ग्रामोद्योग शिक्षण संस्थेचे अधिकारी दत्तात्रय लोंढे, अमित खंडाळे, अक्षय राऊत, महेश नेवसे, अभिषेक बंड व शेखर मरकड यांनी अपार मेहनत घेतली या कार्यक्रमासाठी जॉन्सन कंट्रोल्स इंडिया प्रा. लि. चे सहकारी तसेच  शाळेतील शिक्षक व शाळेतील आजी- माजी विद्यार्थिनी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.