पुणेहडपसर

अण्णासाहेब मगर महाविद्यालयामध्ये सामंजस्य करार

पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे, अण्णासाहेब मगर महाविद्यालय, हडपसर, येथे दिनांक १५ मार्च २०२३ रोजी सूक्ष्मजीवशास्त्र विभाग आणि आरोग्य प्रसारक मंडळाचे, विश्वास पॅरामेडिकल इंस्टिट्यूट ऑफ सायन्स व डॉ. के.टी .पलूसकर ट्रस्टचे, के. पी. पॅरामेडिकल इंस्टिट्यूट, हडपसर, पुणे; यांच्यामध्ये विद्यार्थ्यांच्या कौशल्य विकासाकरिता सामंजस्य करार करण्यात आला.

 

या प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नितीन घोरपडे यांनी या सामंजस्य कराराचा विद्यार्थ्यांच्या कौशल्यनिर्मितीसाठी, तसेच थिअरी व प्रॅक्टिकल्सकरिता प्रत्यक्ष उपयोग होऊन, यातून अधिकाधिक रोजगार उपलब्ध होण्याची संधी निर्माण होऊ शकते असे प्रतिपादन केले.

सदर कार्यक्रमास विश्वास पॅरामेडिकल इंस्टिट्यूट ऑफ सायन्सचे प्रा. दर्शन इश्ती व के. पी. पॅरामेडिकल इंस्टिट्यूटच्या प्राचार्य प्रा. प्रीति कदम, तसेच अण्णासाहेब मगर महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. प्रशांत मुळे, उपप्राचार्य प्रा. अनिल जगताप, आयक्यूएसी कोऑर्डिनेटर डॉ. रमाकांत जोशी, सूक्ष्मजीवशास्त्र विभागप्रमुख प्रा. डॉ. नेहा पाटील, तसेच सूक्ष्मजीव शास्त्र विभागचे इतर सर्व प्राध्यापक उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार प्रा. मंगेश देशपांडे यांनी व्यक्त केले.