पुणे

किल्लारी ते चैत्यभूमी ( मुंबई ) असा बौद्ध धम्म भिक्कू संघाच्या रॅलीचे लोणी स्टेशन येथील चौकात मोठ्या उत्साहात स्वागत…!

पुणे:प्रतिनिधी ( रमेश निकाळजे )

किल्लारी या ठिकाणावरून चैत्यभूमी दादर (मुंबई) येथे चाललेल्या बौद्ध धम्म पद रॅलीचे लोणी स्टेशन (ता. हवेली) येथील चौकात मंगळवारी (ता. ९) संध्याकाळी सात वाजण्याच्या सुमारास मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले,संघासोबत असलेल्या सर्व बौद्ध धर्मगुरूंचे लोणीस्टेशन येथे पुष्पहार देऊन स्वागत करण्यात आले.

लोणी स्टेशन येथील चौकात बौद्ध धम्मगुरुंचे ( भिक्षूंचे ) आगमन झाल्यानंतर भाजपाचे सोशल मीडियाचे जिल्हाध्यक्ष व पुणे प्राईम न्यूज चे संपादक जनार्दन दांडगे व राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष व माजी सरपंच नंदू काळभोर यांच्या हस्ते पुष्पहार देऊन स्वागत करण्यात आले, यावेळी स्थानिक भारतीय बौद्ध महासभेचे तसेंच जिल्हा व तालुका पदाधिकाऱ्यांमध्ये रमेश गायकवाड, रमेश निकाळजे, रघुनाथ साळवे, रवींद्र कदम, नागसेन ओव्हाळ, विजय गायकवाड, बापू चौतमहाल, नागेश जेठीथोर, किशोर कांबळे, लक्ष्मण जगताप, नारायण सुर्वे, सुधीर ओव्हाळ, सुजाता गायकवाड, लक्ष्मी मोरे, सुमन मोरे, छाया ओव्हाळ,संगीता जेटीथोर,खंदारे, वंदना कांबळे,लक्ष्मी बळूरंगी, व बौद्ध उपासक,उपासिका तसेंच समता सैनिक दल मोठ्या संख्येने उपस्थित होते.

लोणी स्टेशन येथील चौकातून घोरपडे वस्ती येथील लोंढे बौद्ध आश्रम पर्यंत बौद्ध भिक्कूंची पद रॅली काढण्यात आली, यावेळी धम्मगुरूंनी धम्मदेशना, बौद्ध धम्माचा प्रचार व प्रसार या विषयांवर बौद्ध अनुयायांना मार्गदर्शन केले, तर या रॅलीचे आयोजन भारतीय बौद्ध महासंघ समता सैनिक दल व सर्व सेवा संस्था यांच्या वतीने करण्यात आले होते.

दरम्यान, किल्लारी येथून हि बौद्ध धम्म पद रॅली शुक्रवारी (ता.५, मे) निघाली आहे, ही रॅली शनिवारी (ता. २३ मे) चैत्यभूमी दादर (मुंबई) येथे पोहोचणार आहे. या रॅलीमध्ये ५० हून अधिक बौद्ध भिक्षूंचा समावेश आहे, तर या रॅलीचे आयोजन पूज्य भदन्त धम्मसार, संघमित्रा बौद्ध विहार (किल्लारी) यांच्या वतीने करण्यात आले आहे.