पुणे

मराठी पत्रकार परिषद हवेली तालुका कार्यकारणी जाहीर : अध्यक्षपदी रमेश निकाळजे यांची तर उपाध्यक्ष पदी स्वप्नील कदम यांची बिनविरोध निवड…!

लोणी काळभोर (प्रतिनिधी)

मराठी पत्रकार परिषद मुंबई व पुणे जिल्हा पत्रकार संघ यांचेशी संलग्न असलेल्या हवेली तालुका पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी रमेश निकाळजे (रोखठोक महाराष्ट्र न्युज ) तर उपाध्यक्षपदी स्वप्नील कदम (रोखठोक महाराष्ट्र न्युज ) यांची निवड करण्यात आली. मराठी पत्रकार परिषदेचे विभागीय सचिव अरुण कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीत बुधवार दि.१७ रोजी नवीन कार्यकारणीची निवड मराठी पत्रकार परिषद चे पुणे जिल्हा अध्यक्ष सुनील लोणकर यांनी जाहीर केली. 

मराठी पत्रकार परिषद हवेली कार्यकारिणी च्या निवडीचा कार्यक्रम  बुधवारी हॉटेल( S 4 G ) एस.फोर.जी. थेऊर फाटा येथे पार पडला. यावेळी रमेश निकाळजे यांची अध्यक्षपदी, तर स्वप्नील कदम यांची उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली. त्याच बरोबर हवेली तालुक्यावर  इतर पदांच्याही निवडी जाहीर करण्यात आल्या. हवेली तालुका कार्याध्यक्षपदी विकास काळभोर, कोषाध्यक्षपदी अक्षय दोमाले, पत्रकार हल्ला कृती समितीपदी दिगंबर जोगदंड यांची निवड करण्यात आली. तसेच संघटक पदी प्रीतम सावंत, कार्यकारिणी सदस्य म्हणून सुनीत जैनजागडे, रुपालीताई काळभोर,मंगल बोरावके, मिलन दाभाडे, सुवर्णा हिरवे यांची निवड करण्यात आल्याचे पुणे जिल्हा संघाचे अध्यक्ष सुनील लोणकर यांनी जाहीर केले.

यावेळी लोणी काळभोरचे सरपंच योगेश नाना काळभोर, उपसरपंच ललिताताई राजेंद्र काळभोर, ऍड. सुजित कांबळे, ऍड. श्रीकांत भिसे, विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन संजयमामा भालेराव, केतन निकाळजे, संदीप बडेकर, विशाल वेदपाठक, सिद्धार्थ काळभोर यांनी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा दिल्या. या प्रसंगी मराठी पत्रकार परिषद प्रतिनिधी एम. जी. शेलार परिषदेचे पुणे जिल्हा प्रशिद्द प्रमुख भरत निगडे, जिल्हा सोशल मीडिया उपाध्यक्ष, राहुल शिंदे, पुणे जिल्हा पत्रकार संघ महिला प्रतिनिधी श्रावणी कामत, पिंपरी चिंचवड पत्रकार संघाचे संघटक राजू वारभुवन व हवेली पत्रकार संघाचे सदस्य उपस्थित होते.