महाराष्ट्र

कृषिमंत्री अब्दुल सत्तार चा राजीनामा तात्काळ घ्या ! वसंत मुंडे

प्रतिनिधी- स्वप्नील कदम

महाराष्ट्राच्या कृषी खात्याच्या इतिहासात कर्मचारी अधिकारी बदल्या पदोन्नती, पिक विमा, खते बी बियाणे औषधी, कृषी विद्यापीठे व कृषी खात्यातील विविध अनुदानात कृषी मंत्र्यांनी रेट कार्ड(दरसुची) ठरवून ६० कोटी पेक्षा जास्त भ्रष्टाचार केलाच आरोप महाराष्ट्र प्रदेश ओबीसी काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष वसंत मुंडे यांनी केला. नागरी सेवा मंडळाने अपात्र केल्यावरही संचालक निविष्ठा व गुण नियंत्रण या पदावर पात्र नसताना विकास पाटील यांचे नियुक्ती करून ५ कोटी रुपये घेतले व रवींद्र भोसले नागपूर विभागीय कृषी संचालक या पदावरून पदोन्नतीने संचालक मृदा संधारण या पदासाठी २ कोटी रुपये घेऊन नियुक्ती देण्यात आली व माजी कृषी मंत्री दादा भुसे यांनी भोसले यांना पदोन्नती मध्ये वगळलेले होते.

औरंगाबाद विभागीय कृषी सहसंचालक दिनकर जाधव यांची एका दिवसासाठी सेवानिवृत्तीचा कार्यकाल शिल्लक असताना व भ्रष्टाचाराच्या चौकशी चालू असतानाही संचालक पदासाठी १ कोटी रुपये घेऊन नियमबाह्य नियुक्त केल्याचा आरोप काँग्रेसचे नेते वसंत मुंडे यांनी केला.कृषी उपसंचालक वर्ग १ ते अधीक्षक कृषी अधिकारी या पदावर प्रत्येकाकडून १० ते २५ लाख रुपयाचा भाव ठरवून ६४ अधिकार्‍यांची पदोन्नती देऊन भ्रष्टाचार केला. गुण नियंत्रण निरीक्षक विभागात बदलीसाठी छोट्या १५ व मोठ्या जिल्ह्यात २५ ते कृषी क्षेत्रातील नामांकित बागायती जिल्ह्यातील ६५ लाख रुपयांचा बदलीचा रेट असून कृषी अधिकारी वर्ग २ ते कृषी अधिकारी वर्ग १ साठी ९२ अधिकारी यांना पदोन्नती देऊन ८ ते ४० लाख रुपये घेऊन बदल्या व पदोन्नती देण्यात आलेली आहे.

तसेच कर्मचारी, कृषी पर्यवेक्षक ते मंडळ कृषी अधिकारी या पदावर ३११ कर्मचाऱ्यांना ३ लाख ते २५ लाखापर्यंत रेट देऊन पैसे गोळा करून नियुक्त देण्यात आल्या, महाराष्ट्रातील जिल्हा परिषद विभागामध्ये कृषी अधिकारी या पदावर ३ लाख ते १३ लाखाचे भाव ठरवून नियुक्त देण्यात आल्या आहेत. नागरी सेवा मंडळाच्या सर्व नियमाचे कृषीमंत्र्याच्या कार्यालयाकडून उल्लंघन झाले असून बदलीसाठी पती-पत्नी मेडिकल न्यायालयाचे आदेश सेवानिवृत्तीचा कार्यकाळ जवळ असल्यास सेवा जेष्ठतेच्या सूचीनुसार कर्मचाऱ्यांना व अधिकाऱ्यांना मंजुरी दिल्यावर बदली पदोन्नती ची कारवाई नियमानुसार केले जाते पण कृषी मंत्रीच्या सोनेरी टोळक्याने सर्व नियमाला बगल देऊन करोडोचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप काँग्रेसनेते वसंत मुंडे यांनी केला .अब्दुल सत्तार कृषी मंत्री यांच्या कार्यालयातील सोनेरी टोळक्याने बंडा कुलकर्णी श्री देवळानंकर दीपक गवळी प्रशांत ठाकरे महेश कुलकर्णी स्वतःची दोन मुले समीर व अमीर सत्तार मोगल विवेक ठाकरे मुशिर शेख अहजाज जामद बाळासाहेब शिरसाट इत्यादींनी खूप मोठ्या प्रमाणावर लागेबंध तयार करून भ्रष्टाचार केला असून बोगस कृषी मंत्र्याचे नाव खाली पथक पाठवून अनेक ठिकाणी धाडी घालून पैसे गोळा करण्याचा जोरदार धंदा चालू आहे. अक्षता फर्टीलायझर या कंपनीवर धाड टाकून मंत्री कार्यालयाचे हितेश भट्टड प्रशांत ठाकरे राम महाजन यांनी ५ लाख रुपये कंपनीकडे लाच मागितली या धाडी मागे मुख्य गुण नियंत्रक प्रवीण देशमुख ,विकास पाटील संचालक गुण नियंत्रण व निविष्ठा यांचा महत्त्वाचा भाग आहे. कृषिमंत्रीचे दौरे दाखवून आवडीचे जेवण मानपान व दिवसभराचा एक ते दीड लाख रुपये खर्च दाखवून कृषी अधिकारी व कृषी दुकानदार यांना वेठीस धरून हप्ते गोळा केले जातात. कृषीमंत्र्याचे व त्यांच्या कार्यालयाचे आदेश पाळले नाही तर संबंधित अधिकाऱ्याची चौकशी लावून बदलीची व निलंबनाची ही धमकी दिली जाते.

विभागीय कृषी सहसंचालक कृषी आयुक्त व मंत्रालयातील नागरी सेवा मंडळ यांनी नियमाला बोट ठेवून बदली व पदोन्नती मध्ये जर काम करता येत नाही असेल दर्शविले तर स्वतः कृषी मंत्री नागरी सेवा मंडळावरील सदस्यांना खालच्या स्तरावरचे भाषा वापरून धमक्या देतात असा आरोप काँग्रेसचे नेते वसंत मुंडे यांनी केला .. ईडीची चौकशी चालू असताना कृषी आयुक्त पदावर पात्र नसतानाही . नागरी सेवा मंडळाने अपात्र केल्यावरही कृषिमंत्र्याचे विश्वासू अधिकारी म्हणून सुनील चव्हाण यांची नियुक्ती करून एमएआयडीसी चा अतिरिक्त कारभारही दिलेला आहे. केंद्र व राज्य सरकारचा तसेच शेतकऱ्याचा विमा भरलेला हप्ता एकत्र करून कृषिमंत्री स्वतः मुख्य सांख्यिकी यांच्याबरोबर व कृषी आयुक्त याना आदेश देऊन प्रत्येक विमा कंपनीकडून 5% टक्केवारी घेऊन आर्थिक व्यवहाराची तोडजोड करतात तसेच ऑटोमॅटिक वेदर स्टेशनच्या सर्वर मध्येच आकडेवारी मनाप्रमाणे बदल करून शेतकऱ्यांना पीक विमा मिळवण्यापासून वंचित ठेवतात या मंत्री कार्यालयाचा हात आहे.कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्या कार्यालयातील सर्व कर्मचारी व कृषी आयुक्त, मुख्य सांख्यिकी, निविष्ठा व गुण नियंत्रण संचालक यांचे मोबाईल फोन व् व्हाॅट्सॲप फोन द्वारे संवाद तपासावा, बदली व पदोन्नती झालेल्या अधिकारी व मंत्री कार्यालयातील कर्मचारी यांचे सीडीआर रिपोर्ट तसेच पेपर टीव्हीवरील बातम्या संदर्भातील चौकशीची मागणी काँग्रेस नेते वसंत मुंडे यांनी केली असून भारताचे पंतप्रधान कृषिमंत्री ,खते औषधी मंत्री, राज्यसभेचे विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व मुख्य सचिव यांना निवेदन देऊन अब्दुल सत्तार कृषिमंत्र्याला तात्काळ राजीनामा देण्याच्या आदेश देऊन सीबीआय, ईडी मार्फत चौकशी करण्याची मागणी भारत सरकार व राज्य सरकारकडे काँग्रेसचे नेते वसंत मुंडे यांनी निवेदनाद्वारे केली आहे.