पुणेमहाराष्ट्र

आशियाई साँबो स्पर्धेत महाराष्ट्राच्या दोन खेळाडूंनी रचला इतिहास

प्रतिनिधी स्वप्नील कदम

आशियाई साँबो स्पर्धेत दोन खेळाडूंनी इतिहास रचला आहे. ७ ते ११ जून २०२३ रोजी घेण्यात आलेल्या अस्थाना कझाकिस्तान मध्ये आयोजित वरिष्ठ आशियाई स्पर्धा २०२३ मध्ये कास्यपदक मिळवून महाराष्ट्र राज्या सोबत भारताचे ही नाव रोशन केले आहे कु. सेजल सिंग (पुणे) महाराष्ट्र ६५ वजनी गटात कॉम्बॅट या प्रकारांमध्ये कास्यपदक पटकावले आहे.

तसेच मनीषा पाटोळे( पुणे )महाराष्ट्र मास्टर ८० वजनी गटात काॅमबॅट या प्रकारामध्ये कांस्यपदक पटकावले आहे. भारत व महाराष्ट्र राज्याला दुहेरी आनंद प्राप्त करून दिला आहे .यांच्या या यशावर भारताचे साँबो इंडिया असोशियन चे अध्यक्ष डॉ. भागीरथ लाल व सचिव शिल्पी अरोरा मॅम तसेच महाराष्ट्राचे सचिव कुमार उगाडे स्पोर्ट्स साँबो असोसिएशन महाराष्ट्र राज्य यांच्यातर्फे शुभेच्छा देण्यात आल्या व पालक वर्गा कडून ही शुभेच्छा चा वर्षाव झाला तसेच भारताकडूनही शुभेच्छा चा वर्षाव झाला.