पुणे

“उरुळी देवाची येथे लागलेल्या भीषण आगीत दहा गुंठ्याचे गोडाऊन जाळून खाक”

फुरसुंगी : उरूळी देवाची येथील प्लायवूड व त्याच्या मशनरी तसेच होम अप्लायन्सेसच्या गोडाऊनला आज पहाटे मोठ्या प्रमाणावर आग लागली. या आगीत दहा गुंठ्याचे गोडाऊन जळून खाक झाले. आगीचे कारण समजू शकले नाही. अग्निशामक दलाच्या आठ गाड्यांनी ही आग आटोक्यात आणली. पहाटे चार वाजता देवाची ऊरळी, मंतरवाडी येथे दोन गोडाऊनला आग लागली.

गोडाऊनमधे प्लायवूड होते. प्लायवूड कटिंग करण्याचे मशीनरी ही पाच गुंठ्याच्या गोडाऊन मध्ये होते. त्याच्याच लगत ५ गुंठ्याच्या गोडाऊन मध्ये होम अप्लायसेस होते. या दोन पाच पाच गुंठ्याच्या गोडाऊनमध्ये मध्ये पार्टिशन होते. ही आग एवढी मोठी होती की, काही वेळेत सर्व साहित्य जळून खाक झाले.

प्रवीण ओसवाल , निखिल ओसवाल, विनोद ओसवाल यांच्या मालकीचे हे गोडाऊन होते. तसेच मोठ्या प्रमाणात भांडी व यंञसामुग्रीचे नुकसान झाले. पीएमआरडीए चे दोन, कात्रज, कोंढवा, काळेपडळचे अशा आठ अग्निशमन वाहने व जवानांकडून आग आटोक्यात आणण्यात यश आले. उरळी देवाची येथील सासवड रस्त्याच्या शेजारी लक्ष्मी हॉटेल आहे. त्याच्या मागील बाजूस १० गुंठ्याचे हे गोडाऊन आहे. यापूर्वी लागलेल्या आगीत दोघांचे जीवही गेले होते. या परिसरात काही वर्षांपूर्वी पहाटेच्या दरम्यान साडीच्या गोडाऊनला मोठी आग लागली होती. त्यामध्ये आगीत मोठे नुकसान होऊन २ लोकांचे जीवही गेले होते. या अशा आगी लागण्यामागे प्रशासनाचे ऑडिट कडे दुर्लक्ष असल्याचे समोर येत आहे. याचप्रमाणे गोडाऊन मालकांनीही आगीपासूनच्या सुरक्षितेसाठी नियोजन करणे गरजेचे आहे.