पुणे

ब्रेकिंग न्युज… हडपसर मतदारसंघात उभी फूट, नेते कार्यकर्ते अजित पवारांच्या गटात – मुंबईत तुफान गर्दी, सुरेश घुले, डॉ. जगदाळे यांच्यासह माजी नगरसेवक दादांच्या तंबूत

मुंबई (अनिल मोरे )

 राष्ट्रवादीत उभी फूट पडल्यानंतर आज मुंबईमध्ये अजित दादांकडून निरोप गेल्याने हडपसर विधानसभा मतदारसंघातील दिग्गज नेते व कार्यकर्ते आणि माजी नगरसेवक मुंबई दाखल झाले.

 प्रदेश उपाध्यक्ष सुरेश घुले हडपसर मतदार संघ अध्यक्ष डॉक्टर शंतनू जगदाळे कार्याध्यक्ष अमर तुपे संदीप बडे यांच्यासह कोंढव्यातील माजी नगरसेवक यांनी अजित पवार यांची भेट घेऊन आम्ही तुमच्या सोबत असल्याची ग्वाही दिली.

 माजी नगरसेवक आनंद अळकुंटे यांनी आधीच अजित पवार यांची भेट घेतली तर पुणे शहरातील अनेक दिग्गज माजी नगरसेवक देखील अजितदादांच्या तंबूत दाखल झाले त्यातच हडपसर विधानसभा मतदारसंघातील दिग्गज नेते व कार्यकर्ते यांनी देखील मुंबईत अजित पवार यांची भेट घेतली.

 हडपसर महिला अध्यक्ष पूनम पाटील कार्याध्यक्ष वैष्णवी सातव, माजी सभापती शितल गारुडकर, माजी जिल्हा परिषद शिवाजी खलसे मुंबईला अजित पवारांकडे पोहोचले आहेत. 

 माजी नगरसेवक फारूक इनामदार, प्रशांत म्हस्के, अनिस सुंडके, रईस सुंडके, हसीना इनामदार यांनी अजित पवार यांची भेट घेऊन आम्ही सोबत आल्याचे सांगितले.

 

हडपसर मतदारसंघ अजित पवारांच्या ताब्यात….

 हडपसर विधानसभा मतदारसंघातील जवळजवळ सर्व नेते पदाधिकारी मोठ्या संख्येने अजित पवार यांच्या गटात सामील झाल्याने या मतदारसंघावर अजित पवार यांचा वर चष्मा दिसत आहे आमदार चेतन तुपे यांनाही अजित पवार यांच्या गटात जाण्याशिवाय पर्याय राहिला नाही.

 

माजी महापौर अजित पवार यांच्या गटात….

पुण्याच्या माजी महापौर महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस राजलक्ष्मी भोसले यांनी देखील मुंबईत उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली, त्यामुळे अजून एक धक्का शरद पवार गटाला बसला आहे.