पुणे

आपल्या प्रकृती संदर्भात जागृत रहायला हवे – डॉ. शंतनू जगदाळे

डॉक्टर या नात्याने सर्व बालमित्र आणि कुटुंबातील सर्वांनी आपल्या प्रकृती संदर्भात जागृत राहून रोज झेपेल एवढा व्यायाम करायला हवा असे आवाहन डॉ. शंतनू जगदाळे यांनी केले.

 

15 ऑगस्ट या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने अनुथम हौ.सोसायटी येथे झेंडावंदन कार्यक्रमात आयरमॅन डॉ. जगदाळे बोलत होते. यावेळी झेंडावंदन आर्मी ऑफिसर श्री तपन गोस्वामी यांच्या हस्ते संपन्न झाले. दक्षिण आफ्रिकेत काॅमेड मॅरेथॉन स्पर्धा पूर्ण केल्याबद्दल डॉ शंतनु जगदाळे अनुथम सोसायटी मधील सभासद सौ. जाधवर ( MPSC A वर्ग ), माधवी तुपे (केयर एंड cure मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल ) यांचा सत्कार करण्यात आला.

 

सुधीर मेथेकर, किसन कोलते सर यांनी मनोगत व्यक्त केले तर रिदीमा माने, स्वराली माने, त्रिशिता गोस्वामी, सान्वी मेथेकर आदींनी स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने भाषणे केली गीत गायन केले.
स्वातंत्र्य दिनानिमित्त आरोग्य शिबीर आयोजित करण्यात आले होते, यावेळी सुमारे 35 जनांनी याचा लाभ घेतला.डॉ. स्वाती सोनवणे यांनी पॅरेलेसिसचा धोका कसा ओळखावा आणि उपचार संदर्भात मार्गदर्शन केले. आभार सोसायटीचे चेअरमन संतोष तुपे यांनी मानले.