पुणे

वैदू समाजातील दशरथ शिंदे यांचे अल्पशा आजाराने निधन

हडपसर / पुणे (प्रतिनिधी )

भोलेनाथ तरुण मंडळाचे अध्यक्ष, वैदू समाजाचे पुणे जिल्हा अध्यक्ष दशरथ शिंदे (वय 42) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले, त्यांच्या मागे आई वडिल, भाऊ, बहीण पत्नी दोन मुली, एक मुलगा असा परिवार आहे.
वैदूवाडी येथे वास्तव्यास असलेल्या दशरथ शिंदे यांनी वैदू समाजाला मुख्य प्रवाहात आणण्याचे काम केले. भोलेनाथ तरुण मंडळाच्या वैदू समाजातील पहिला सामुदायिक विवाह सुरु केला तसेच सामुदायिक 54 जणांची मुंज कार्यक्रम आयोजित केला होता.
दशरथ शिंदे यांस कर्करोग झाला, कर्करोगाशी दिलेली झुंज अपयशी ठरली.
त्यांच्या अंत्यविधीला विविध क्षेत्रातील मान्यवर व वैदू समाजातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
वैदू समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांनी आपले आयुष्य खर्च केले.