Uncategorized

अनिवासी भारतीयांकडून शिकागो (अमेरिकेत) गणेशोत्सवाचा जल्लोष….

महर्षी नगर

संपूर्ण देशभर गणेशोस्तव साजरा होत असताना अनिवासी भारतीयांनी अमेरिकेतील शिकागो, अर्लिनहाईट्स, मिल्वाकी, कोलंबस, इलिनॉय शहरात मोठ्या उस्तावात गणेशोस्तव साजरा करण्यात आला. अनेक ठिकाणी युवकांकडून गणेशोस्तव साजरा करण्यात आला. अमेरिकन नागरिकांनाकडून इंडियन एलिफंट गॉड म्हणून आवरजून स्वागत करण्यात येत होते.

मील्वाकी व शिकागो मध्ये ढोल ताशांच्याचे गजरात मिरवणूका काढण्यात आल्या. कॉलेजियन्सकडून मोठ्या उस्तावत गणेशोत्सव करण्यात येत होता. रोज सायंकाळी आरत्या, प्रसाद, मोदक, जेवणावळी आयोजित करण्यात येत होत्या. यामध्ये पुणे, मुंबईकर बरोबर कोल्हापूर, सातारा, नागपूर या शहरातील अनिवासी भारतीयांचा उस्फुर्त सहभाग दिसून आला.

विकॉन्सी विद्यापीठातील भारतीय विद्यार्थ्यांनी कॉलेज परिसरात गणेशाची स्थापना करून भारतीय संस्कृतीचे दर्शन घालून दिले. यात प्रामुख्याने नम्रता शेवाळे,अनुष्का रोडी,प्रितीशा पाटील, अथर्व दाहोत्रे,कैवल्य पातकर, तन्मय कालेकर,श्रेयस चाटे, मिहिर दीक्षित, कृष्णा सोमाणीशुभम सोमाणी, केतकी सोमाणी, रिधान सोमाणी, कृष्ण सोमाणी, निकिता शर्मा, अंकित शर्मा, अपूर्वा अनंतवर, तन्मय सिंग, प्रतिक कोल्हे, स्नेहल कोल्हे, श्रेयश कुलकर्णी, अनिमेश पवार, शिवांजली जाधव, कौस्तुभ पातकर, अदिती पातकर यांचा मोठा सहभाग दिसून आला. अनंतचतुर्दशीला मिस्कोंसी मधील विकॉन्सी विद्यापीठातील अनिवासी भारतीयांनी कॉलेज परिसरात शास्त्रोत्र पद्धतीने गणेश मूर्तीचे विसर्जन केले. मोठ्या उस्त्वत भावपूर्ण नयनांनी गणेशाला निरोप दिला.