पुणेमहाराष्ट्र

मोफत गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाची तपासणी व जनजागृती शिबिर :

स्मितसेवा फाउंडेशन, विवान वेल्फेअर फाऊंडेशन, मणीकर्णिका ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाची तपासणी व जनजागृती शिबिर घेण्यात आले. या शिबिराचे आयोजक स्मितासेवा फाउंडेशन अध्यक्ष व भारतीय जनता पार्टी पुणे शहर ओबीसी मोर्चा सरचिटणीस स्मिताताई तुषार गायकवाड, विवान फाउंडेशन च्या उषाताई भालेराव, मणीकर्णिका ग्रुपच्या मनीषाताई राऊत यांच्या प्रयत्नातून हे शिबिर घेण्यात आले.

गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाचे धोके आणि प्रतिबंध याबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी तसेच गर्भाशयाच्या ग्रीवेचा कर्करोग लवकर शोधून त्यावर उपचार करण्यासाठी या शिबिराचे आयोजन करण्यात आले.. यावेळी शेकडो महिलांची मोफत गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाची तपासणी करण्यात आली. या शिबिराचे वैशिष्टे म्हणजे जर कोणी डिटेक्ट झाले तर मोफत तापासणी, शिवाय मोफत उपचार व उपचारासाठी येण्या जाण्याचा खर्च देखील मोफत करण्यात येणार आहे.