पुणेमहाराष्ट्र

ॲड.अनिता गवळी यांची यशवंत ग्राहक आधार प्रतिष्ठान (महिला विभाग) महाराष्ट्र प्रदेश जिल्हा शासकीय ग्राहक संरक्षण कमिटीवर निवड

प्रतिनिधी -स्वप्नील कदम

यशवंत ग्राहक आधार प्रतिष्ठान
महाराष्ट्र प्रदेश. (अराजकीय ग्राहक संघटन )गेली अनेक वर्षापासून या प्रतिष्ठानचे काम पाहता, महाराष्ट्र शासन- अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या वतीने ॲड. अनिता सूर्यकांत गवळी प्रदेशाध्यक्ष- यशवंत ग्राहक आधार प्रतिष्ठान, (महिला विभाग) महाराष्ट्र प्रदेश यांची जिल्हा शासकीय कमिटीवर ग्राहक संरक्षण परिषद, पुणे जिल्हा या ठिकाणी नुकतीच नियुक्ती केली आहे.

या परिषदेचे कामकाज जिल्हाधिकारी साहेब यांच्या अध्यक्षते खाली चालते व शासनाच्या विविध जिल्ह्याचे प्रमुख असे २० ते २१ खात्याचे प्रमुख हे या परिषदेचे सदस्य असतात. तसेच व्यापारी उद्योग, पेट्रोल पंप, गॅस वितरण, कृषी उत्पन्न बाजार समिती,महानगरपालिका ,नगरपरिषद, व शेतकरी असे प्रत्येकी १ सदस्य या मध्ये असतात तसेच ग्राहक चळवळीचे शासनाने आखून दिलेल्या चौकटीमध्ये असलेल्या ग्राहक संघटना पैकी दहा सदस्य यामध्ये घेतले जातात , असे एकूण ३६ ते ३८ मान्यवरांची ही कमिटी असते, येथे आलेल्या प्रश्नांची तत्काळ सोडून केली जाते ,बघू – पाहू ,सांगतो , नंतर पाहतो असे या ठिकाणी अधिकारी वर्ग म्हणू शकत नाही, असे कामकाज या ठिकाणी प्रत्येक महिन्याला चालते, प्रत्येक प्रश्नाची सोडुनच होत असताना ज्या त्या विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना जबाबदार धरले जाते त्यावर त्वरित कारवाई करण्याच्या सूचना दिल्या जातात तसेच ,
ग्राहक संरक्षण परिषद – प्रत्येक मासिक मीटिंगमध्ये जिल्ह्यातील ग्राहकांच्या समस्या, अडचणी व शासनातील उदासीनता तसेच ग्राहक कायद्याचे जनजागृतीचे प्रचार व प्रसिद्धी , ग्रामीण भागामध्ये ग्राहक कायद्याची माहिती देणे तसेच विविध खात्याचे उद्दिष्ट व त्याची संपूर्ण माहिती ग्रामीण भागातील ग्राहकापर्यंत जाण्यासाठी शासन दंडशक्ती व ग्राहक शक्ती यांचे मनोमिलन कसे करता येईल यावर भर दिला जातो, इत्यादी विविध कार्यक्रम घेऊन प्रशासन यामध्ये सहभागी होत असते.