पुणेमहाराष्ट्र

धक्कादायक!लोणीकंद पोलीस स्टेशन हद्दीत वेश्या व्यवसाय जोमात ;पोलीस प्रशासन कोमात…!

पुणे : प्रतिनिधी : रमेश निकाळजे

पुणे : पुण्यातील लोणीकंद पोलीस स्टेशन च्या हद्दीमध्ये दरबार रेस्टॉरंट & लॉजिंग आणि मनोरा लॉजिंग याठिकाणी अवैध्यपणे वेश्या व्यवसाय मोठ्या प्रमाणात सुरु आहे. सदरील चालणाऱ्या अवैध्य वेश्या व्यवसायामुळे स्थानिक नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत असून खासकरून दरबार लॉजिंग जवळील रस्त्याने जात असताना महिला, मुली तसेच शाळेत जाणारी मुले यांना असुरक्षित वाटत असल्याच्या अनेक तक्रारी आहेत.

कारण दरबार लॉजिंग रस्त्यालगत असल्यामुळे लॉजिंग मध्ये जाणारे ग्राहक आपली शारीरिक भूक मिटवण्यासाठी नशा करून तेथे जात असतात त्यामुळे कधी कधी तेथून जाणाऱ्या येणाऱ्या महिला व मुलींसोबत छेडछाड करत असल्याच्या अनेक तक्रारी आहेत. तरीही पोलीस मात्र बघ्याची भूमिका घेऊन गप्प बसतात असे स्थानिकांकडून समजते. पोलिसांकडून त्यांच्यावर कसल्याही प्रकारची कारवाई होत नाही. त्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये कमालीची नाराजी पसरली असून लवकरात लवकर येथील लॉजिंग बंद करण्यात यावे अशी मागणी होत आहे. लोणीकंद पोलीस ठाण्याचे वरिष्ठ अधिकारी याप्रकरणी काय भूमिका घेणार हे पाहणे महत्वाचे आहे.