पुणे

हरिभाऊ काळे यांना डॉ, बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार प्रदान

हडपसर:- मांजरी येथील सामाजिक कार्यकर्ते श्री हरिभाऊ काळे यांना ते गेली सत्तावीस वर्षे करीत असलेल्या विविध सामाजिक कार्याची दखल घेऊन महाराष्ट्र शासनाच्या वतीने डॉ बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार मुंबई येथे प्रदान करण्यात आला.

 

माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, तसेच सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग सचिव सुमंत भांगे,यांच्या उपस्थितीत हा पुरस्कार प्रदान करण्यात आला, स्मृतीचिन्ह, शाल, सन्मानपत्र, मानधन, असे पुरस्काराचे स्वरूप होते यापूर्वी हरिभाऊ काळे यांना राष्ट्रीय समाजभूषण पुरस्काराने सन्मानित केले आहे,