पुणे

शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या प्रचारार्थ हवेली तालुक्यातील आव्हाळवाडी येथे गावभेट दौऱ्याचे आयोजन, आढळराव पाटील यांचे जंगी स्वागत

हवेली : महायुतीचे शिरुर लोकसभेचे अधिकृत उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या प्रचारार्थ हवेली तालुक्यातील आव्हाळवाडी येथे गावभेट दौऱ्याचे आयोजन करण्यात आले. यावेळी विठ्ठल मंदिरात दर्शन घेऊन गावभेटीस सुरवात करण्यात आली. दरम्यान, परिसरातील नागरिकांनी मोठ्या जल्लोषात आढळराव पाटील यांचे जंगी स्वागत केले. वाजत-गाजत यावेळी स्वागत करण्यात आले.

यावेळी महायुतीचे शिरुर लोकसभेचे अधिकृत उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील, सरपंच नितीन घोलप, माजी उपसरपंच विलास बबन आव्हाळे, युवा मोर्चा उपाध्यक्ष गणेश बापू कुटे, सोमनाथ आव्हाळे, शरद आव्हाळे, नितीन आव्हाळे, माणिक आव्हाळे, संतोष तांबे, अरविंद आव्हाळे, अमोल आव्हाळे, गणेश सातव, दादासाहेब सातव, विशाल कुटे, नितीन सयाजी आव्हाळे, काकासाहेब सातव पाटील, माजी उपसरपंच पप्पु कुटे, गणेश सातव, प्रशांत सातव, अविनाश कुटे
आदी महायुतीमधील घटक पक्षांचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

दरम्यान, यावेळी बोलताना उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील म्हणाले, ” आव्हाळवाडी गावाने मला भरभरून दिले आहे. गावाशी माझे जुने त्रणानूबंध आहेत. गावाच्या विकासासाठी व मतदार संघात राहिलेली कामे पुर्ण करण्यासाठी शिंदे साहेब, अजित दादा, देवेंद्रजी यांच्या माध्यमातून मोठा निधी आणायचा आहे. केंद्रात आपले म्हणजे मोदीजी यांचे सरकार येणार आहे. आपल्या सर्व योजना आपण पुर्ण करु, परंतू त्यासाठी मोदीजी यांच्या विचाराचा खासदार आपल्याला निवडून आणावा लागेल. मला केलेले मतदान म्हणजे मोदीजी यांना केलेले मतदान होय. सर्व प्रश्न मार्गी लावण्यासाठीये मोदीजी यांच्या विचाराचा खासदार निवडून द्या. येणाऱ्या 13 तारखेला आपण जागृत राहून मला घड्याळाला जास्तीत-जास्त मतदान करावे हीच विनंती करतो.

दरम्यान, शरद आव्हाळे यावेळी बोलताना म्हणाले, शिवाजी दादा तुम्हाला खासदार करण्यासाठी गावातून जास्तीत-जास्त मतदान करणार आहोत. मागच्या निवडणुकीपेक्षा यावेळी जास्त लीड तुम्हाला देऊ. यावेळी अनेक ग्रामस्थांनी भाषणे केली. शिवाजी दादा यांना मोठे लीड देण्याचा यावेळी ग्रामस्थांनी संकल्प केला.