पुणे

चालक म्हणून काम करणाऱ्यावर गुन्हा अंगावर घेण्यासाठी दबाव – अल्पवयीन आरोपीच्या आजोबांना पोलिसांनी केली अटक

पुण्यात एका अल्पवयीन मुलाने पोर्श कार मद्यधुंद अवस्थेत भरधाव चालवत दोघांना चिरडलं. या भयंकर अपघातात अनिश अवधिया आणि अश्विनी कोस्टा या दोघांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर या मुलाला अटक करण्यात आली. मात्र अवघ्या १५ तासांत त्याला जामीन मिळाला. ज्यामुळे प्रचंड संताप व्यक्त झाला. या घटनेची तातडीने दखल घेत देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी पोलिसांची बैठक घेतली आणि कुणाचीही गय केली जाणार नाही हे सांगितलं. या प्रकरणात आधी मुलाच्या वडिलांना आणि आज मुलाच्या आजोबांना अटक करण्यात आली आहे. तसंच या मुलाची रवानगी बालसुधारगृहात करण्यात आली आहे. पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी आजोबांनी या प्रकरणात त्यांच्या कुटुंबासाठी चालक म्हणून काम करणाऱ्यावर गुन्हा अंगावर घेण्यासाठी दबाव टाकला होता.

पैशांची ऑफर, चालकाने गुन्हा अंगावर घ्यावा म्हणून त्या डांबूनही ठेवलं – आजोबांना केली अटक

पोलिसांनी आज अल्पवयीन आरोपीच्या आजोबांना अटक केली आहे. अल्पवयी मुलाचे आजोबा पुण्यातील नामांकित बांधकाम व्यावसायिकाचे वडील आहेत. अपघाताच्या वेळी पोर्श कार तू चालवत होता असं पोलिसांना सांग. त्यासाठी त्याला पैशांची ऑफर दिली होती. तसंच चालकाने गुन्हा अंगावर घ्यावा म्हणून त्या डांबूनही ठेवलं होतं. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी याबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे.