पुणे

“हरवलेल्या दहा वर्षाच्या मुलीची दहा तासानंतर आई-वडिलांसोबत भेट, बच्चूसिंग टाक यांच्या सतर्कतेमुळे मुलगी आईच्या कुशीत

पुणे (प्रतिनिधी )
शहीद भगतसिंग जीवनरक्षक फाउंडेशनच्या अध्यक्षाच्या सतर्कतेमुळे हरवलेल्या दहा वर्षाच्या मुलीला पोलिसांच्या मदतीने आई-वडिलांच्या सुखरूप स्वाधीन केले. दरम्यान एकटी मुलगी रस्त्याने रडत फिरत असल्याने जाणकार नागरिकांनी पुढाकार घेणं अपेक्षित असताना, केवळ बघ्याची भूमिका नागरिक घेत होते. मात्र सामाजिक कार्यकर्ते बच्चूसिंग टाक यांच्या सतर्कतेमुळे मायलेकीची भेट झाली. नैसर्गिक आपत्तीत धावून येणाऱ्या बच्चूसिंग टाक च्या या कार्यामुळे कौतुक होत आहे.

 

राजस्थानी आई-वडिलांसोबत असलेल्या दहा वर्षाच्या अल्पवयीन मुलगी हडपसर रेल्वे स्टेशन येथून चुकामूक झाली आणि सदर मुलगी तब्बल सात ते आठ तास ही भरकटत हडपसर गाडीतळ पर्यंत चालत पुढे आली. इकडे आई-वडील व दुसरे बहीण तिचा शोध घेत होते, हरवलेल्या मुलीला मोबाईल नंबर सांगता येत नव्हता. त्यामुळे सदर मुलगी एकटी रडत गाडीतळ परिसरामध्ये रडत असताना अनेक नागरिकांनी विचारपूस केली, दरम्यान हडपसर येथील शहीद भगतसिंग जीवनरक्षक फाउंडेशनचे जीवरक्षक बच्चूसिंग गुरमुखसिंग टाक यांनी गर्दी पाहून गेले असता, सदर हरवलेल्या मुलीला हिंदी मधून विचारपूस केली असता ती मुलगी अहमदाबादची असल्याचे समजले, व हडपसर रेल्वे स्टेशन येथे आई-वडिलांसोबत असताना हरवल्याचे तिने सांगितले. यानंतर बच्चूसिंग टाक यांनी सदर हरवलेल्या दहा वर्षाच्या मुलीला दुर्लक्ष न करता तिला पाणी पाजून हडपसर पोलीस ठाण्यात घेऊन हरवलेल्या मुलीची माहिती दिली. पोलिसांनीही दहा वर्षाच्या अल्पवयीन मुलीचा विषय लक्षात घेता, तिची पोलीस ठाण्यात नोंद करून घेतली. यावेळी बच्चूसिंग टाक यांनी पुढाकार घेऊन महिला पोलिसांसोबत रेल्वे स्टेशन परिसरामध्ये मुलीच्या आई-वडिलांचा शोध घेतला. अखेर हडपसर हडपसर रेल्वे स्टेशन या ठिकाणी हरवलेल्या मुलीचे आई-वडील रडत असल्याचे दिसून आले त्यांच्यासोबत विचारपूस केली असता सदर हरवलेली मुलगी आमचीच आहे त्यांनी सांगितले, हडपसर पोलिसांनी सदर हरवलेल्या मुलीचे आई-वडिलांना हडपसर पोलीस ठाण्यात बोलावून त्यांचा जबाब घेऊन मुलीला सुखरूप त्यांच्या ताब्यात दिले. हडपसर पोलिस ठाणे अंमलदार मनोज सकट यांनी शहीद भगतसिंग जीवनरक्षक फाउंडेशनचे अध्यक्ष बच्चुसिंग टाक व आझाद सिंग टाक यांचे आभार मानले.

 

दहा वर्षाची मुलगी हडपसर गाडीतळ येथे रडत असल्याचे दिसून आले, त्यामुळे सदर मुलीला विचारले असता ती मुलगी अहमदाबाद वरून रेल्वे स्टेशन येथे आल्याचे सांगितले, हडपसर की पुणे रेल्वे स्टेशन हे समजून येत नव्हते, त्यामुळे पोलिसांच्या मदतीने शोध घेत असताना हडपसर रेल्वे स्टेशन येथे आई-वडील मिळून आले. हडपसर पोलिसांच्या उपस्थितीत मुलीला आईच्या स्वाधीन केले. एकटी मुलीसोबत काहीही अनुचित प्रकार होऊ शकतो, त्यामुळे तातडीने या मुलीला पोलीस ठाण्यात नेऊन आई-वडिलांचा शोध घेतला. हरवलेली मुलगी पुन्हा आईच्या कुशीत गेल्याने आईच्या चेहऱ्यावरचा आनंद खूप मोठा होता. याचे मला समाधान आहे.

बच्चूसिंग टाक
अध्यक्ष – शहिद भगतसिंग जीवनरक्षक फाउंडेशन