पुणे

मराठी पत्रकार परिषद हवेली तालुका अध्यक्ष पदी स्वप्नील कदम यांची बिनविरोध निवड…!

प्रतिनिधी – 

मराठी पत्रकार परिषद मुंबई व पुणे जिल्हा पत्रकार संघ यांचेशी संलग्न असलेल्या हवेली तालुका पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी स्वप्नील सुभाष कदम यांची निवड करण्यात आली. परिषदेचे विश्वस्त किरण नाईक, महाराष्ट्र अध्यक्ष शरद पाबळे, मुंबई प्रदेश अध्यक्ष राजा अदाटे, विभागीय सचिव गणेश मोकाशी, आणि परिषद प्रतिनिधी एम.जी शेलार, जिल्हाध्यक्ष सुनील लोणकर, जिल्हा उपाध्यक्ष रमेश निकाळजे, यांचा हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले.हा कार्यक्रम लोणी काळभोर येथील मधुबन कार्यालयात संपन्न झाला. या वेळी कदमवाक् वस्तीचे माजी सरपंच नंदू काळभोर , कदमवाक् वस्तीचे माजी उपसरपंच बाबाराजे काळभोर, तसेच माजी उपसरपंच ऋषिकेश काळभोर, व युवा नेते गौरव काळभोर, दत्ता आंबुरे उपस्थित होते.