पुणे

“मांजराईनगर 2000 झोपड्या नियमित करण्यासाठी जिल्हाधिकारी स्तरावर बैठक घ्या, शिष्टमंडळाची खासदार डॉ.अमोल कोल्हे यांच्याकडे मागणी – खासदारांकडून सकारात्मक प्रतिसाद…

मांजरी बुद्रुक येथील 2000 झोपडीधारकांच्या मालकी हक्काबाबतचा प्रश्न अनेक वर्षापासून प्रलंबित असून जिल्हाधिकारी स्तरावर बैठक घेऊन हा प्रश्न मार्गी लावावा व गोरगरिबांना न्याय द्यावा अशी मागणी अखिल मांजराई नगर नागरिक कृती समितीच्या वतीने अध्यक्ष राजेंद्र साळवे यांनी खासदार डॉ.अमोल कोल्हे यांच्याकडे निवेदन द्वारे केली आहे.
पुणे येथील शासकीय निवासस्थानी खासदार डॉ.अमोल कोल्हे यांची अखिल मांजराईनगर नागरिक कृती समितीच्या शिष्टमंडळाने भेट घेतली, यावेळी डॉ.कोल्हे यांची खासदार पदी निवडून आल्याबद्दल सत्कार केला तसेच निवेदन देऊन अध्यक्ष राजेंद्र साळवे यांनी मागण्यांची भूमिका स्पष्ट केली.

डॉ.कोल्हे यांच्याशी चर्चा करताना शिष्टमंडळांनी सांगितले की मौजे मांजरी बुद्रुक येथील सर्वे नंबर 159ई/1 गायरान जागा वन विभाग 2000 झोपड्यांची मालकी हक्क प्राप्त होणे कामी 2003 पासून गेली 21 वर्षे जिल्हाधिकारी यांच्याकडे मागणी प्रलंबित आहे, मांजरी गाव पुणे महापालिकेत समाविष्ट झाले आहे, करआकारणी सह, पाणी, रस्ते, ड्रेनेज या मूलभूत सोयी सुविधांसाठी नागरिकांना मोठ्या प्रमाणात अडचणींना सामोरे जावे लागत आहे. 2000 झोपडीधारकांना मालकी हक्क प्राप्त होण्या कामे जिल्हाधिकारी स्तरावर संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घ्यावी अशी आग्रही मागणी डॉ.अमोल कोल्हे यांच्याकडे यावेळी करण्यात आली.

अधिवेशन समाप्तीनंतर जिल्हाधिकारी स्तरावर बैठक…
अखिल मांजराई नगर नागरिक कृती समितीच्या शिष्टमंडळाने निवेदन दिले आहे, त्यांच्या मागण्या सविस्तर समजून घेतल्या आहेत, पहिल्या अधिवेशन समाप्तीनंतर जिल्हाधिकारी व संबंधित अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेऊन हा प्रश्न सोडवण्यासाठी पुढाकार घेणार आहे.
डॉ.अमोल कोल्हे
खासदार – शिरूर लोकसभा