पुणेहडपसर

अण्णासाहेब मगर यांनी पुणे जिल्ह्याच्या विकासाची संस्थात्मक पायाभरणी केली : निलेश मगर अण्णासाहेब मगर महाविद्यालयात अण्णासाहेब मगर यांना अभिवादन

अण्णासाहेब मगर यांनी सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय, शैक्षणिक, कृषी,सहकार क्षेत्रात भरीव कामगिरी करत पुणे जिल्ह्याच्या विकासाची संथात्मक पायाभरणी केली. त्यांनी शहराच्या व जिल्हाच्या विकासाच्या दृष्टीने पायाभूत सुविधा निर्माण केल्या. हरित क्रांती, सहकार चळवळ या बरोबर शैक्षणिक क्षेत्रात प्रगती व्हायला पाहिजे असे त्यांचे धोरण होते. विद्यार्थी दशेपासूनच पुरोगामी विचारांचा त्यांच्यावर प्रभाव होता. त्यांना पुणे जिल्हयाचे शिल्पकार म्हटले तरी वावगे ठरणार नाही.” असे प्रतिपादन पुणे शहराचे माजी उपमहापौर निलेश मगर यांनी केले.

पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या अण्णासाहेब मगर महाविद्यालयात अण्णासाहेब मगर यांच्या पुण्यतिथिनिमित्त अण्णासाहेब मगर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या प्रसंगी निलेश मगर बोलत होते.

महाविद्यालयाचे प्राचार्य व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉ. नितीन घोरपडे यांनी अण्णासाहेब मगर यांच्या दातृत्वाचा वारसा मगर कुटुंबीय जपत असून महाविद्यालयाच्या विकासासाठी योगदान देत असल्याचे सांगितले.

या प्रसंगी अरुण मगर, गजानन मगर, किशोर मगर, प्रदीप मगर, उपप्राचार्य डॉ. शुभांगी औटी, डॉ. प्रशांत मुळे, प्रा.अनिल जगताप, प्रा. विलास शिंदे, डॉ. प्रवीण ससाणे, प्रा. डॉ. नाना झगडे, डॉ. अशोक ससाणे, डॉ. राजेश रसाळ, प्रा. नितीन लगड, प्रा. भाऊसाहेब भोसले, प्रा. अनिल देवकाते आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. नितीन लगड यांनी केले तर आभार डॉ. प्रशांत मुळे यांनी मानले.