पुणेमहाराष्ट्र

मराठी पत्रकार परिषद संलग्न पुणे जिल्हा आणि हवेली तालुक्याच्या वतीने वारकऱ्यांना मसाला दूधाचे वाटप…!

प्रतिनीधी -स्वप्नील कदम

पुणे : लोणी काळभोर”साधू संत येती घरा तोची दिवाळी दसरा” या उक्तीप्रमाणे जगतगुरू संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्यात पुणे जिल्हा पत्रकार संघ व हवेली तालुका पत्रकार संघ यांच्या वतीने पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांना मसाला दुधाचे वाटप करण्यात आले. यावर्षी प्रथमच जगतगुरू संत तुकाराम महाराज यांची पालखी कदमवाकवस्ती येथील पालखी तळ याठिकाणी मुक्कामास असल्यामुळे संपूर्ण कदम वाकवस्तीमधील वातावरण अतिशय आनंदमय झाले होते.

मागील वर्षी हवेली तालुक्याच्या वतीने केळी, गुडदाणी, राजगिऱ्याचे ५०० लाडू वाटप करण्यात आले होते. यावर्षी रमेश निकाळजे यांची पुणे जिल्हा उपाध्यक्ष पदी निवड झाली तसेच स्वप्नील कदम यांची तालुका अध्यक्ष पदी निवड करण्यात आली.त्यामुळे पुणे जिल्हा उपाध्यक्ष रमेश निकाळजे तसेच हवेली तालुका अध्यक्ष स्वप्नील कदम यांनी त्यांच्या सर्व पदाधिकारी यांच्यासोबत संयुक्त रित्या पुणे जिल्हा व हवेली तालुक्याच्या वतीने ५०० वारकऱ्यांना मसाला दुधाचे वाटप केले.

वाटप करते वेळी पुणे जिल्हा उपाध्यक्ष रमेश निकाळजे, हवेली तालुका अध्यक्ष स्वप्नील कदम,अक्षय दोमाले संघटक सनी फलटणकर, रुपाली काळभोर, दीपाली घाडगे, रमेश गायकवाड सनी काळभोर, प्रणव निकाळजे,मुकेश मगरे,बबलू अन्सारी, तुषार वर्मा,कौस्तुभ कदम इत्यादी उपस्थित होते.