पुणे

“खा.डॉ.कोल्हे यांचा हडपसर विधानसभा मतदारसंघात जनता दरबार, हडपसर विधानसभा मतदारसंघावर केले लक्ष केंद्रित…

हडपसर विधानसभा मतदारसंघातील अनेक प्रश्न प्रलंबित असून खासदारांच्या माध्यमातून ते सोडवण्यासाठी हडपसर मध्ये जनता दरबार भरवला असून नागरिकांनी आपले प्रश्न येथे मांडावेत असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी केले आहे.

डॉ.अमोल कोल्हे दुसऱ्यांदा खासदार झाल्यानंतर हडपसर विधानसभा मतदारसंघात नागरिकांच्या सोयीसाठी जनता दरबार भरवीत आहेत यासाठी राष्ट्रवादी कांग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी पुढाकार घेतला आहे, पाच जुलै रोजी सकाळी 10 ते 12 या वेळेत हडपसर मधील कन्यादान मंगल कार्यालयात तर साडेबारा ते दोन या वेळेत रामटेकडी वानवडी क्षेत्रीय कार्यालयात जनता दरबार आयोजित करण्यात आला आहे, या जनता दरबारात नागरिकांची निवेदने स्वीकारले जाणार आहेत.

 

नागरिकांच्या आलेल्या तक्रारीचे वर्गीकरण करून संबंधित प्रशासनांसोबत बैठक घेऊन हडपसर विधानसभा मतदारसंघातील प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी नियोजन केले जाणार असल्याचे प्रशांत जगताप यांनी सांगितले.

 

विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने हडपसर वर लक्ष केंद्रित…
मागील विधानसभा निवडणूक घेत ज्यांना निवडून आणले ते विरोधात गेल्याने खासदार डॉ.अमोल कोल्हे यांनी हडपसर विधानसभा मतदारसंघावर लक्ष केंद्रित केले आहे, हडपसर मध्ये जास्तीत जास्त वेळ देऊन येथे प्रलंबित प्रश्न व नागरिकांची कामे मार्गी लावण्यासाठी विभागवार जनता दरबार भरवले जाणार आहेत, खासदार डॉक्टर कोल्हे यांनी हडपसर मतदार संघावर लक्ष केंद्रित केले असून महाविकासआघाडीचा आमदार निवडून आणण्याच्या दृष्टीने रणनीती आखली जात आहे.

५ जुलै रोजी सायंकाळी ६ वाजता कोंढवा खुर्द येथील पारगे लॉन्स येथे खा. सौ. सुप्रिया सुळे व खा.डॉ. अमोल कोल्हे यांचा हडपसर विधानसभा मतदारसंघ व पुरंदर-हवेली विधानसभा मतदारसंघ महाविकास आघाडीच्या वतीने भव्य नागरी सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला आहे.