(पुणे)- पुणे शिवसेनेच्या वतीने गुन्हेगारांवर जरब बसविणाऱ्या महाराष्ट्र पोलिसांचे अभिनंदन व चिमुरडीवर बलात्कार करणाऱ्या अक्षय शिंदेची बाजू घेणाऱ्या विरोधकांचा जाहीर निषेध करण्यात आला, शिवसेना शहरप्रमुख प्रमुख प्रमोद नाना भानगिरे म्हणाले की, चिमुरडीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीने पोलिसाची रिव्हॉल्वर हातात घेऊन पोलिसांवरच गोळीबार केला, तीन पोलिस त्यात जखमी झाले असून पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी गोळीबार केला आणि त्यात आरोपीचा मृत्यू झाला आहे परंतु, विरोधक कुठलीही माहिती न घेता या घटनेवर प्रतिक्रिया देत सुटले आहेत. एन्काऊंटर की हत्या असा प्रश्न उपस्थित करून पोलिसांच्या शौर्यावर संशय व्यक्त करणे हे दुर्दैव आहे.
जखमी पोलीस अधिकाऱ्याच्या बाबतीत विरोधकांना काही घेणं देणं नाही पण अक्षय शिंदे मारला गेला याचं त्यांना दुःख होत आहे हे प्रचंड दुर्दैवी असून विरोधकांच्या या दुटप्पी भूमिकेमुळे पोलिसांच्या मनोधैर्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पोलिसांचं मनोबल कायम रहावं ही भावना समस्त शिवसैनिकांनी व्यक्त केली, त्यांच्या पराक्रमाचं कौतुक व्हावं तसंच महाराष्ट्रातील जनता कायम त्यांच्या पाठीशी असून आधी साडेचार वर्षाच्या चिमुकलीवर झालेल्या अत्याचाराच्या दुर्दैवी घटनेचे विरोधकांनी राजकारण केले. आता तो नराधम पोलिसांच्या चकमकीत मारला गेला तर त्यावरूनही राजकारण करत आहेत असेही प्रमोद नाना भानगिरे म्हणाले, आता पोलिसांवर आरोप करणे ही दुटप्पीपणाची हद्द झाली आहे. या आरोपीला भरचौकात फाशी द्या अशी मागणी करणाऱ्यांना आता त्याच्याविषयी एवढी आपुलकी कशी वाढली हा आघाडीच्या नेत्यांना सामान्य जनतेचा प्रश्न आहे. यावेळी समवेत शहर प्रवक्ते अभिजित बोराटे, सहसंपर्क प्रमुख महिला आघाडी सुदर्शना त्रिगुनाईत,शहर संघटक श्रीकांत पुजारी,प्रमोद प्रभुणे,लक्ष्मण आरडे,श्रीकांत पुजारी,धनंजय जाधव,पंकज कोद्रे,उपशहर प्रमुख,सुनील जाधव,विकी माने,स्मिता साबळे,आकाश रेणूसे ,नितीन लगस, निलेश जगताप,निलेश धुमाळ,समीर नाईक, सुवर्णा शिंदे,मोहित काकडे,राजू परदेशी व समस्त शिवसैनिक उपस्थित होते.