पुणे

जोरदार शक्तिप्रदर्शन करत महाविकासआघीडीचे बापूसाहेब पठारे यांचा उमेदवारी अर्ज दाखल

पुणे : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचं बिगूल वाजलं आहे. निवडणूक आयोगाकडून आज पत्रकार पकरिषद घेऊन याबाबत माहिती देण्यात आली. केंद्रीय निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी पत्रकार परिषदेत महाराष्ट्र आणि झारखंड विधानसभा निवडणुकीच्या कार्यक्रम जाहीर केला. महाराष्ट्रात 26 नोव्हेंबरआधी नवं सरकार बनणार आहे. सर्व पक्षाचे उमेदवार अमेदवारी अर्ज देखील दाखल करत आहेत. अशातचं आता वडगाव शेरी मतदार संघातून राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) उमेदवारी मिळालेले माजी आमदार बापूसाहेब पठारे यांनी सोमवारी जोरदार शक्तीप्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

पठारे यांनी पुर्ण मतदारसंघात रॅली काढून त्यांनी जोरदार शक्तीप्रदर्शन देखील केले. तत्पुर्वी त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना येथील जनता त्रस्त झालेली आहे. त्यामुळे जनतेने यंदा बापूसाहेब पठारे यांनाच आमदार करण्याचा निश्चय केलेला आहे. या मतदार संघातून कोणाचे आवाहन नाही, असे त्यांनी म्हंटले आहे.

पुण्यातील बहुचर्चित पैकी एक वडगावशेरी मतदार संघ येतो. आयटी पार्क तसेच विकसीत परिसर असलेल्या या वडगाव शेरीत लोहगाव, खराडी, वाघोलीचा काही परिसर, येरवडा, विश्रांतवाडी चंदननगर असा परिसर आहे. माजी आमदार राहिलेले बापूसाहेब पठारे यांना यावेळी शरद पवार यांच्या पक्षाकडून उमेदवारी देण्यात आली आहे. बापूसाहेब पठारे यांची मतदारसंघात पकड आहे. त्यांतचा सरपंच ते आमदार असा प्रवास राहिलेला आहे. त्यामुळे कोण बाजी मारणार हेदेखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

पठारे यांनी खराडीमधून ग्रामपंचायत सदस्य ते सरपंच होत आपल्या राजकीय जीवनास सुरुवात केली. नंतर ते पंचायत समिती, जिल्हापरिषद सदस्य आणि नंतर पुणे महानगरपालिकेत नगरसेवक म्हणून निवडून आले. ते स्थायी समितीचे अध्यक्ष राहिलेले आहेत. त्यानंतर २००९ मध्ये राष्ट्रवादी पक्षाकडून आमदार झाले. नंतर त्यांनी निवडणूक लढवली नाही. मध्यंतरी त्यांनी भाजपत प्रवेश केला होता. परंतु, राष्ट्रवादीची फुटाफूट झाल्यानंतर पुन्हा ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात (शरद पवार गट) परत आले. आता दुसऱ्यांदा ते निवडणुकीला सामोरे जात आहेत. राष्ट्रवादीचे (अजित पवार गट) विद्यमान आमदार सुनिल टिंगरे यांच्यासोबत त्यांचा सामना होणार आहे. विद्यामान व माजी आमदार असा हा सामना वडगाव शेरीत रंगला जाणार आहे.