अपघात किंवा काही वैद्यकीय कारणांनी पाय गमावलेल्या दिव्यांगांना कृत्रिम पाय दिनांक 23 मार्च 25 रोजी महाराष्ट्र आरोग्य मंडळाच्या सुमती भाई शाह आयुर्वेद महाविद्यालयांमध्ये बसविण्यात आले. दिनांक 9 मार्च 25 रोजी पायांचे माप घेण्याचे शिबिर घेण्यात आले होते. इलेक्ट्रिकल ॲक्सेसरीज मधील प्रख्यात नामवंत कंपनी लीग्रांट यांच्या सीएसआर फंडाच्या आर्थिक साहाय्याने महाराष्ट्र आरोग्य मंडळ हडपसर पुणे व रोटरी क्लब ऑफ न्यू कल्याण यांच्या संयुक्त विद्यमाने दिव्यांगांसाठी कृत्रिम पाय बसविण्याचे शिबिर घेण्यात आले होते.
पाय गमवलेल्या व्यक्ती केवळ त्यांचा रोजगार गमावत नाहीत तर स्वाभिमानाने जीवन जगण्याची उमेद गमावतात. वजनाने हलके व उत्तम दर्जाचे कृत्रिम पाय विनामूल्य मिळालेले दिव्यांग बांधव सर्वांना आपल्या पायावर उभे राहू शकतील. या शिबिरासाठी महाराष्ट्र आरोग्य मंडळाचे सचिव श्री अनिल गुजर, सहसचिव श्री अरुण गुजर, लीग्रांट कंपनीचे प्रतिनिधी श्री विशाल सुतार, श्री सोमेन पारी रोटरी क्लब ऑफ न्यू कल्याण चे प्रेसिडेंट श्री बिजू उन्नीथन, रोटरीयन कैलास देशपांडे, रोटरीयन सुखदा देशपांडे,, प्रीतम पाटील, राजकुमार, सुरेंद्र सिंग, दिव्यांशु गुंडिया व तसेच महाराष्ट्र आरोग्य मंडळाचे प्रतिनिधी उपस्थित होते .
या शिबिरामध्ये पुणे, सातारा, अहिल्यानगर, सोलापूर, कोल्हापूर, धाराशिव, वर्धा या जिल्ह्यातील दिव्यांगांनी सहभाग घेतला या शिबिरामध्ये ९ वर्षांच्या बालकापासून ते 75 वर्षाचे वृद्ध सहभागी झाले. शिबिरामध्ये एकूण 53 दिव्यांगांना साठ कृत्रिम पाय बसविण्यात आल्याची माहिती संस्थेचे सचिव श्री अनिल गुजर यांनी दिली. याप्रसंगी आयोजित कार्यक्रमांमध्ये श्री भगवान चौधरी यांनी सर्वांचे आभार मानले.