पुणे

कल्याणीनगरमधील अंडरगार्मेंटच्या दुकानात चोरी करणारा अटकेत येरवडा पोलिसांची कामगिरी ः सात लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त

पुणे ः अंडरगार्मेंटच्या दुकानातून आठ लाखांची चोरी करणाऱ्याला येरवडा पोलिसांनी अटक केली. गणपत मांगिलाल डांगी (वय ४४, रा. विठ्ठलनगर, सिंहगड रोड, पुणे) असे अटक केलेल्याचे नाव आहे. आरोपीकडून ७ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. कल्याणीनगरमधील एस. एल. एन्टरप्रायजेस दुकानातून जॉकी कंपनीत चोरी करणारा कल्याणीनगर येथे थांबला असल्याची माहिती सूत्रांक़डून पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आरोपीला ताब्यात घेऊन तपास केला.

त्यावेळी आरोपीने दुकानातून लेडीज-जेन्ट्स अंडरगार्मेंटची चोरी केल्याची कबुली दिली. आरोपीला अटक करून ७ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलीस उपायुक्त हिंमत जाधव, सहायक पोलीस आयुक्त प्रांजली सोनवणे, येरवडा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र शेळके, पोलीस निरीक्षक (गुन्हे) पल्लवी मेहेर, पोलीस निरीक्षक (गुन्हे) विजय ठाकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक सुनील सोळुंके, पोलीस उपनिरीक्षक प्रदीप सूर्वे, पोलीस हवालदार दत्ता शिंदे, तुषार खराडे, किरण घुटे, सागर जगदाळे, अनिल शिंदे, अमोल गायकवाड, प्रशांत कांबळे, नटराज सुतार, विजय अडकमोल, बालाजी सोगे, भीमराव कांबळे, संदीप जायभाय, सुधीर सांगडे यांच्या पथकाने ही कामगिरी केली.