माखजन/ प्रतिनीधी:(विलास गुरव) संगमेश्वर तालुक्यातील सरंद चे रहिवासी व माखजन पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे माजी अध्यक्ष शशिशेखर रमाकांत भागवत यांचे हृदय विकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले ते ७२ वर्षांचे होते.
शशिशेखर भागवत यांनी माखजन पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्षपद प्रभावीपणे भूषवले.त्यांच्या कार्यकाळात कनिष्ठ महाविद्यालयाची सुरवात झाली. त्यांनी अध्यक्षपद भूषावताना शाळेचा नावलौकिक वाढवा यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले.माध्यमिक शाळेला कनिष्ठ महाविद्यालय जोडून १९९५ च्या सुमारास ग्रामीण विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण मिळण्यासाठी सोय उपलब्ध करून दिली.अध्यक्ष पद भूषवण्यापूर्वी व नंतर च्या काळात ते संस्थेवर संचालक म्हणून कार्यरत होते.
तसेच सरंद ग्रामपंचतीवर उपसरपंच म्हणून पद भूषवले. शशिशेखर भागवत हे उत्तम छायाचित्रकार होते.जुनी मॅट्रिक झाल्यावर त्यांनी मुंबई येथे दूरदर्शन साठी छायाचित्रकार म्हणून काम करून नावलौकिक कमावला होता.त्यांची सरंद येथील लक्ष्मी नारायणावर निस्सीम श्रद्धा होती.
त्यांच्या पश्चात पत्नी,मुलगा मुली,सून नातवंड ,जावई असा परिवार आहे.
त्यांच्या निधनाची बातमी कळताच अनेकांनी त्यांच्या निवासस्थानी धाव घेतली.