पुणे

“सहकार खात्याच्या पुढाकाराने सोसायटी सभासदांसाठी मार्गदर्शन मेळावा — विविध शासकीय अधिकाऱ्यांचे सखोल मार्गदर्शन”

आंतरराष्ट्रीय सहकार वर्षानिमित्त महाराष्ट्र राज्य सहकार खाते व पुणे जिल्हा सहकारी गृहनिर्माण फेडरेशन यांच्या वतीने सोसायटी सभासदांकरीता ”मार्गदर्शन मेळावा” हा कार्यक्रमआयोजित करण्यात आला होता त्यावेळी विशेष पाहुणे व मार्गदर्शक म्हणून विविध शासकीय अधिकारी उपस्थित होते.

या कार्यक्रमाला सहकार खात्याचे पुणे शहर उपनिबंधक संजय राऊत उपस्थित होते. त्यांनी मानीव अभिहस्तांतरण यावर मार्गदर्शन केले.
पुणे ग्रामीण उपनिबंधक प्रकाश जगताप यांनी सहकारी संस्था व्यवस्थापनावर आधारित अशी माहिती व मार्गदर्शन केले.

उपनिबंधक सहकारी संस्था डी.एस. हौसारे पुणे शहर (४) यांनी सहकारी संस्था यांनी कामे करताना कोणत्या अडचणी येतात त्यावर कश्याप्रकारे निर्णय घेऊन अमंलबजावणी करावी यावर सविस्तर माहिती दिली. सोसायटीचा कारभार करताना ती एका कु़टुंबाप्रमाणे मानून केल्यास सोसायट्या मधील वादविवाद कमी होऊन सोसायटी प्रगती पथावर नेण्यास मदत होते असे त्यांनी विविध सोसायट्यांचे दाखले देऊन मार्गदर्शन केले.

 

महाराष्ट्र राज्य वीज वितरण चे अधिकारी श्री निलेश रोहणकर यांनी पंतप्रधान सूर्य घर योजना यावर खूप महत्वाचे असे मार्गदर्शन केले. पुणे जिल्हा सहकारी सोसायटी फेडरेशन चे संचालक मंडळ विलास थोरात यांनी प्रास्ताविक आणि स्वागत केले. सुभाष कर्णिक यांनी आंतरराष्ट्रीयसहकार वर्ष याबाबत माहिती दिली  संजय सूर्यवंशी यांनी मानीव अभिहस्तांतरण याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. यावेळी नगरसेवक योगेश बापू ससाणे, वैभव माने व इतर बऱ्याच सोसायट्यांचे सदस्य, पदाधिकारी उपस्थित होते.

 

माननीय सहकार खात्याने व पुणे जिल्हा सहकारी गृह निर्माण फेडरेशन व महाराष्ट्र राज्य वीज वितरण यांनी मिळून असेच मार्गदर्शन मेळावे आयोजित करावे. सोसायटीच्या सभासदांना याचा नक्कीच लाभ होईल.

रिडेव्हलपमेंट करताना, PMC नेमताना बरेच निकष आहेत ते पाळावे आणि बिल्डर हा फार विचार करून तपासून कसा निवडावा असे मत फाँष फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष वैभव माने-पाटील यांनी मांडले.

मा. नगरसेवक योगेश बापू ससाणे यांनी अश्या कार्यक्रमांना पुढील काळात मोठ्या स्वरूपात आयोजन करून अधिका-अधिक सोसायट्यांपर्यंत या सरकारी योजानांची माहिती पोहचवण्याचे योगदान देऊ अशी भूमिका मांडली. तसेच, सर्व सोसायट्यांना सहकारी संस्थेचे कार्य कसे असावे याबाबत मार्गदर्शन केले.

आभार प्रदर्शन महेश पवार यांनी केले.

या कार्यक्रमाचे निमंत्रक
वर्धमान टाउनशिप फेडरेशन चे सतीश हिंगणे, महेश पवार, मधुकर यादव.
फोष फेडरेशनचे पदाधिकारी संतोष ननवरे. अतूल फड, ड्रीम्स आकृती चेअरमन प्रवीण लांडगे व सोबतच इतर फेडरेशन आणि सोसायट्यांच सहकारी उपस्थित होते.