लोणीकाळभोर: दि. ०६ : मराठी पत्रकार परिषद मुंबई, पुणे जिल्हा पत्रकार संघ संलग्न, हवेली तालुका पत्रकार संघाच्या हवेली तालुका उपाध्यक्षपदी मा. बापूसाहेब बबन चौधरी यांची निवड करण्यात आली. त्यांच्या नियुक्ती चे पत्र पुणे जिल्हा निरीक्षक एम.जी शेलार, पुणे जिल्हा महिला अध्यक्ष श्रावणीताई कामत, पुणे जिल्हा उपाध्यक्ष रमेश निकाळजे जिल्हा सचिव जीवन शेंडकर व हवेली तालुका प्रत्रकार संघाचे अध्यक्ष स्वप्निल कदम यांच्या हस्ते देण्यात आले.
दि. ५ रोजी हवेली तालुका अध्यक्ष स्वप्नील कदम यांच्या वाढदिवसानिमित्त संपर्क कार्यालय कदम वाक वस्ती लोणी स्टेशन येथे वृक्षारोपण कार्यक्रम घेण्यात आला. त्याच वेळी हवेली तालुका उपाध्यक्ष पदी बापूसाहेब चौधरी यांना निवडीचे पत्र देण्यात आले.निवडीनंतर बोलताना बापूसाहेब चौधरी यांनी सांगितले, की मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस, एम देशमुख सर यांच्या नेतृत्वाखाली तसेच महाराष्ट्र अध्यक्ष मिलिंद आष्टीवकर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच पुणे जिल्हा अध्यक्ष सुनील लोणकर यांच्या मार्गदर्शनाखाली हवेली तालुका पत्रकार संघटना कार्य वाढीसाठी तसेच समाजातील अन्याय व अत्याचार याला वाचा फोडण्यासाठी काम करणार असल्याचे सांगितले,
याप्रसंगी तालुका सदस्य सनी फलटणकर पत्रकार सदस्य माजी ग्रामपंचायत सदस्य अशोक शिंदे, जेष्ठ नेते रामदास पवार, युवा नेते शहाजी मिसाळ, भाऊ कुंजीर, शिवाजी मिसाळ, जाफर सय्यद, दिलीप शेवाळे, दत्ता अंबुरे, रमेश गायकवाड, तसेच संघातील पत्रकार व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच निवडीबद्दल सर्वच थरातून त्यांचेवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.