पुणे

मुज्जम्मील शेख यांनी अवघ्या वयाच्या 27 व्या वर्षी नॅशनल न्यूज चॅनेलचे मालक-संपादक बनून महाराष्ट्र बुक ऑफ रेकॉर्डमध्ये कोरले आपले नाव वयाच्या अवघ्या 27 व्या वर्षी पत्रकाराची कमाल…

पुणे : पत्रकारिता हा लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ मानला जातो, तसेच पत्रकारिता हे सतीचे वाण आहे असेही म्हटले जाते. हाच वसा आणि वारसा घेऊन अगदी तरुण वयात पत्रकारितेत सक्रिय झालेल्या मुजम्मील शेख या युवकाने अत्यंत कमी वयात म्हणजे अवघ्या २७ व्या वर्षी एका नॅशनल न्यूज चॅनेलचे मालक-संपादक बनून मोठी कमाल केली आहे. या अनोख्या कर्तृत्वामुळे मुजम्मील शेख यांनी महाराष्ट्र बुक ऑफ रेकाॅर्डमध्ये आपले नाव कोरण्याचा पराक्रम केला आहे.

मुज्जम्मी शेख आणि पत्रकारिता एक अतूट रेशीमबंध…
पत्रकारितेच्या क्षेत्रात नवे मानदंड निर्माण करणारे मुज्जम्मील शेख यांनी अवघ्या 27 व्या वर्षी नॅशनल न्यूज चॅनेलची स्थापना करून त्याचे प्रसारण ओटीटी, सेट अप बॉक्स आणि सर्वाधिक डिजिटल प्लॅटफॉर्मवर प्रेक्षपण करण्याचा मान मिळवणारे महाराष्ट्रातील सर्वात कमी वयाचा संपादक व मालक म्हणून नवा इतिहास रचला आहे. त्यांच्या या अभूतपूर्व यशाची नोंद महाराष्ट्र बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये करण्यात आली. मुज्जम्मील शेख यांच्या अथक परिश्रमामुळे पत्रकारितेच्या क्षेत्रात त्यांची वेगळी ओळख निर्माण झाली असून, त्यांनी समाजासाठी नवे आदर्श निर्माण केले आहेत. तरुणाईसाठी हे एक प्रेरणादायी उदाहरण ठरत आहे.

प्रेरणादायी युवा कार्याचा झाला सन्मान…
महात्मा फुले सांस्कृतिक भवन, फातिमा नगर येथे मौलाना आझाद एज्युकेशन अँड स्पोर्ट्स असोसिएशन यांच्या वतीने शिक्षक दिनानिमित्त आयोजित विशेष सत्कार समारंभात मुज्जम्मील शेख यांचा गौरव करण्यात आला.
हा कार्यक्रम महाराष्ट्र बुक ऑफ रेकॉर्ड व मौलाना अब्दुल कलाम आझाद एज्युकेशन अँड स्पोर्ट्स असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला होता. महाराष्ट्र बुक ऑफ रेकॉर्ड चे अध्यक्ष आदम सय्यद यांच्या हस्ते मुज्जम्मील शेख यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला.

यावेळी राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाचे सल्लागार अली दारुवाला, माजी नगरसेविका नंदा लोणकर, तसेच मौलाना आझाद असोसिएशनचे आमनत शेख, सतीश राठोड, स्नेहा कुलकर्णी, असिफ इकबाल शेख, इक्बाल अन्सारी, मजहर मणियार, पत्रकार सोहेल शेख, फरहान शेख, शरद बागडे, उद्योजक जॉन्सन थॉमस आदी मान्यवर उपस्थित होते.

या वेळी अध्यक्ष आदम सय्यद यांनी प्रतिक्रिया दिली की, “मुज्जम्मील शेख यांसारखे तरुण पत्रकार समाजासाठी प्रेरणादायी उदाहरण आहेत. त्यांनी अल्पावधीत मिळवलेले यश आणि डिजिटल पत्रकारितेतील त्यांचा प्रभाव हे तरुण पिढीला नवा मार्ग दाखवणारे आहे. त्यांच्या कार्यामुळे पत्रकारितेच्या क्षेत्राला नवी दिशा मिळत आहेत आणि त्यांचा सन्मान करणे ही आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे.”