मानव धर्म प्रणेते सद्गुरुदेव श्री सतपालजी महाराज यांच्या प्रेरणेने, ‘मानव धर्म आश्रम’ पुणे प्रभारी महात्मा सुकीर्ती बाईजी व महात्मा सुर्यकिरण बाईजी यांच्या मार्गदर्शनामध्ये, शनिवार दि. २७ सप्टेंबर २०२५ रोजी
हडपसर पोलीस स्टेशन ते बंटर बर्नाड स्कुल परिसर येथे स्वच्छता अभियान उपक्रम राबविण्यात आला.
स्वच्छता अभियान उपक्रमाचा शुभारंभ महात्मा सुकीर्ती बाईजी व महात्मा सुर्यकिरण बाईजी, श्री.सुनील दादा बनकर (मा.नगरसेवक-पुणे महानगरपालिका), श्री योगेश ससाणे (मा.नगरसेवक-पुणे महानगरपालिका), विजय देशमुख (म.नगरसेवक-पुणे महानगरपालिका) नानासो गवळी सर (आरोग्य निरीक्षक हडपसर विभाग-पुणे महानगरपालिका), अनिल मोरे सर (हडपसर पत्रकार संघ) मान्यवर आणि पुणे युथ, मानव सेवा दल, असंख्य प्रेमी भक्तांच्या उपस्थितीत झाला. स्वच्छता अभिमान मोहिमेत हडपसर गाडीतळ येथील पुणे महानगरपालिकेच्या सर बंटर बर्नाड मुलींची शाळा आणि परिसर येथे सकाळी १०:०० ते १:०० हा स्वछता अभियान उपक्रम राबविण्यात आला. कचऱ्यासोबतच शाळेच्या अवतीभवती वाढलेले अनावश्यक गवत, झाडांचा वाळलेला कचरा यावेळी एकत्रित करण्यात आला.
मानव उत्थान सेवा समितीच्या स्वछता अभियान उपक्रमास पुणे महानगरपालिका हडपसर क्षेत्रिय कार्यालयाच्या वरिष्ठ अधिकारी निरीक्षक सौ.भारती ताई टिळेकर, आरोग्य निरीक्षक श्री.नानासो गवळी सर, अधिकारी सौ.वैशालीताई आदिनाथ फुंदे यांचे विशेष सहकार्य लाभले. अतिशय उत्साहात व आनंदमय वातावरण स्वच्छता अभियान कार्यक्रम संपन्न झाला.