पुणे

धक्कादायक बातमी……. कमला नेहरू रुग्णालयातील “डायलिसिस यंत्रणा” पडली बंद भाजपच्या कृपेने पुण्यात गरीब रुग्णांना ‘ बुरे दिन’

पुणे – (रोखठोक महाराष्ट्र न्युज ऑनलाईन)
महापालिकेच्या कमला नेहरू रुग्णालयातील 6 डायलिसिस मशिन्स 10 दिवसांपासून बंद असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या ठिकाणी नियमितपणे डायलिसिस साठी येणाऱ्या रुग्णांची संख्या 63 असून महिन्याला 500 रुग्णांचे याठिकाणी डायलिसिस होते. दहा दिवसणापासून ही यंत्रणा बंद पडल्याने नियमित येणारे गरीब कुटुंबातील 2 रुग्ण अत्यवस्थ असून त्यांच्यावर ससून रुगणालयात उपचार सुरू आहेत. येथील डायलिसिस यंत्रणा तत्काळ सुरू करावी अन्यथा आंदोलन करण्यात येईल, असा इशारा स्थानिक नगरसेविका पल्लवी जावळे यांनी दिला आहे.
कमला नेहरू रुग्णालयामध्ये तीन वर्षांपूर्वी गरीब रुग्णांसाठी मोफत डायलिसिस सुरू करण्यात आले. सुरवातीला लायन्स क्लब कडून ही यंत्रणा राबविण्यात येत होती. मोफत सुविधेमुळे शहराच्या विविध भागामधील गरीब रुग्णांचा ओघ वाढला आहे. परंतु दहा दिवसांपूर्वी अचानक एकाचवेळी सर्व मशिन्स दुरुस्तीला नेतो असे सांगून नेण्यात आल्या आहेत. डायलिसिस ही अत्यावश्यक सेवा असताना ती अचानक पणे बंद ठेवण्यामागे काही तरी काळेबेरे असल्याचा आरोप शिवसेनेच्या नगरसेविका पल्लवी जावळे यांनी केला आहे. अचानक सेवा बंद केल्याने नियमितपणे डायलिसिससाठी येणाऱ्या रुग्णांचे हाल होत आहेत. यापैकी दोन रुग्णांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यांना उपचारासाठी ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, असे जावळे यांनी सांगितले.
जावळे म्हणाल्या, की याठिकाणी होणाऱ्या डायलिसिस चा ऑडिट रिपोर्ट करावा अशी मागणी सातत्याने करत आहोत. परंतु प्रशासनाकडून काहीच प्रतिसाद मिळत नाही. डायलिसीस चालकाला पालिकेकडून दरमहा 6 ते 8 लाख बिल अदा केले जाते, अशी आमची माहिती आहे. परंतु त्याने अचानक डायलिसीस मशीन नेल्याने यामागील संशय वाढला आहे. या मशीन कशासाठी नेल्या याचाही खुलासा प्रशासनाने करावा. तसेच तातडीने डायलिसीस सुविधा सुरू करावी अशी आमची मागणी आहे.
आरोग्य प्रमुख रामचंद्र हंकारे म्हणाले, की संबंधित डायलिसिस केंद्र चालकासोबत केलेल्या कराराची तपासणी करून तातडीने त्याला नोटीस बजवावी असे आदेश अधिकाऱ्यांना दिले आहेत. डायलिसिस यंत्रणा तातडीने सुरू करण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत.

0 0 votes
Article Rating
20 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments