सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे, जो पाहून तुम्हालाही प्रश्न पडला असेल की हा नेमका प्रकार काय? नर्मदा नदीच्या काठावरचा हा व्हिडिओ सध्या चर्चेचा विषय ठरतोय.
पाहुयात नेमकी काय आहे ही घटना!
नर्मदा नदीमध्ये ‘दादाजी धूनीवाले’ बाबांनी तब्बल ११ हजार लिटर दुधाने अभिषेक केला. या दुधाची किंमत सुमारे साडेसात लाख रुपये सांगितली जात आहे. विशेष म्हणजे ड्रोन कॅमेऱ्यातून या सगळ्याचं चित्रीकरण करण्यात आलं.
पण दुसरीकडे, देशातला सामान्य माणूस आपल्या मुलांसाठी ७० रुपये लिटरचं दूध खरेदी करतानाही दहावेळा विचार करतोय, त्यातही पाणी मिसळून कसाबसा प्रपंच चालवतोय. अशा परिस्थितीत, भक्तीच्या नावाखाली हजारो लिटर दूध नदीत वाहून देणं कितपत योग्य आहे?
हाच प्रश्न आता सोशल मीडियावर सर्वसामान्य नागरिक विचारत आहेत.
