पुणे

11 महिन्यांच्या आदितीचा मृत्यू! 4 डॉक्टरांवर गुन्हा दाखल

पुण्यातून एक हादरवणारी बातमी…
अवघ्या ११ महिन्यांच्या आदितीचा मृत्यू…
आणि कारण? चुकीचे उपचार!
नवी पेठेतील एका खासगी रुग्णालयात
उलटीच्या त्रासामुळे दाखल केलेल्या चिमुकलीवर उपचार सुरू होते…
पण कुटुंबाचा आरोप – डॉक्टरांकडून गंभीर निष्काळजीपणा झाला!
या प्रकरणाची चौकशी ससून रुग्णालयाच्या तज्ज्ञ समितीकडे देण्यात आली…

आणि अहवालात धक्कादायक निष्कर्ष समोर आला –
उपचारामध्ये त्रुटी… आणि त्यामुळेच मृत्यू!
यानंतर सहकारनगर पोलिसांनी
४ डॉक्टर आणि २ नर्सेसवर गुन्हा दाखल केला आहे.
एका निष्पाप जीवाचा अंत…
आणि वैद्यकीय व्यवस्थेवर मोठा प्रश्नचिन्ह!
पालकांचा सवाल –
“जर वेळेत आणि योग्य उपचार झाले असते,
तर आमची आदिती आज जिवंत असती का?”
पुण्यातील या घटनेमुळे
वैद्यकीय निष्काळजीपणाचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.