पुणे

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या हडपसर विधानसभा अध्यक्षपदी डॉ. शंतनू जगदाळे, कार्याध्यक्षपदी अमर तुपे व संदीप बधे यांची निवड

पुणे (रोखठोक महाराष्ट्र ऑनलाईन न्युज )
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या हडपसर विधानसभा अध्यक्षपदी डॉ. शंतनू जगदाळे तर कार्याध्यक्षपदी अमर तुपे व संदीप बधे यांची फेरनिवड करण्यात आली.
राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी पुण्यात आयोजित कार्यक्रमात नियुक्तीचे पत्र दिले. यावेळी महिला प्रदेशाध्यक्ष रूपालीताई चाकणकर , आमदार सुनिल टिंगरे,शहराध्यक्ष दीपक मानकर, कार्याध्यक्ष प्रदीप देशमुख ,मा महापौर राजलक्ष्मी भोसले, दत्ता धनकवडे,मा.विरोधी पक्षनेते दिपाली धुमाळ, बाबुराव चांदेरे,सर्व नगरसेवक उपस्थित होते.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरद पवार व अजित पवार असे दोन गट झाल्यानंतर हडपसर विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष डॉ. शंतनु जगदाळे, कार्याध्यक्ष अमर तुपे व संदीप बधे यांनी आपल्या समर्थकांसह मुंबई येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन त्यांच्या गटात सामील झाले होते.
पुणे शहराध्यक्षपदी दीपक मानकर यांची निवड झाल्यानंतर विधानसभा अध्यक्षांची नियुक्ती करण्यात आली, यामध्ये हडपसर विधानसभा अध्यक्ष म्हणून डॉ. शंतनू जगदाळे तर कार्याध्यक्ष म्हणून अमर तुपे आणि संदीप बधे यांची फेरनिवड करण्यात आली आहे.
त्यांच्या निवडीबद्दल हडपसर विधानसभा मतदारसंघातील अनेक पदाधिकाऱ्यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

 

महाराष्ट्र राज्याचा व पुणे जिल्ह्याचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी आमचे नेते अजित पवार यांनी राज्यात सत्तेत सहभागी होण्याचा निर्णय घेतला त्यांच्या या निर्णयाला आमचे पूर्णपणे समर्थन असल्याने आम्ही अजित पवार यांच्या गटात सामील होण्याचा निर्णय तातडीने मुंबई येथे जाऊन घेतला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आदेशान्वये माझी हडपसर विधानसभा अध्यक्षपदी निवड झाली असून पुणे शहराध्यक्ष दीपक मानकर यांच्या नेतृत्वाखाली हडपसर विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस बळकट करण्यासाठी कार्यरत राहणार तसेच लवकरच विधानसभा मतदारसंघाची कार्यकारीणी जाहीर करण्यात येईल.
डॉ.शंतनू जगदाळे
अध्यक्ष – हडपसर विधानसभा राष्ट्रवादी काँग्रेस
अजित पवार गट