पुणे

Breking news : पुण्यात अजित पवार ऍक्शन मोडमध्ये; पुणे शहरात मोर्चेबांधणीला सुरुवात…!

पुणे: 02 जुलै 2023 रोजी महाराष्ट्रातील राजकारणात मोठा भूकंप झाला होता. कारण या दिवशी अजित पवार शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झाले होते.
त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये दोन गट पडले होते. अजित पवार आणि शरद पवार.त्यामुळे पक्षात वातावरण टाईट झाले होते. सगळे कार्यकर्ते संभ्रमात पडले होते. आता वातावरण जरा शांत झाले आहे.सध्या निवडणुका तोंडावर आल्यामुळे दोन्ही गटांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. याच पार्श्वभूमीवर अजित पवार ऍक्शन मोडमध्ये आल्याचे दिसून आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर शरद पवार यांनी महाराष्ट्रभर दौरे करायला सुरुवात केली आहे. त्याचबरोबर शरद पवारांच्या जागोजागी जाहीर सभा होत आहे.

 

तर दुसरीकडे अजित पवार यांनी देखील पक्षबांधणीला सुरुवात केली आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटाचा पुण्यामध्ये एक कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमाला दिलीप वळसे पाटील, रूपाली चाकणकर,
सुनील तटकरे आदी नेते उपस्थित राहणार आहे. या कार्यक्रमामध्ये पक्षातील कार्यकर्त्यांना जबाबदाऱ्या दिल्या जाणार आहेत. राष्ट्रवादी शरद पवार गटापेक्षा आपला गट मजबूत व्हावा, यासाठी अजित पवार प्रयत्न करताना दिसत आहे. पुणे शहर दोन्ही नेत्यांचा बालेकिल्ला आहे. त्यामुळं पुण्यामध्ये आपलं वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी अजित पवार आणि शरद पवार दोन्हीही गट जोरदार तयारी करताना दिसत आहे.

दरम्यान, काल (17 ऑगस्ट) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांची बीडमध्ये जाहीर सभा पार पडली. त्यांच्या या सभेला उदंड प्रतिसाद मिळालेला दिसला आहे. त्याचबरोबर या सभेमध्ये बोलत असताना शरद पवार यांनी विरोधकांना चांगलं सुनावलं आहे.

त्यामुळं शरद पवार यांना सडेतोड उत्तर देण्यासाठी अजित पवार त्यांच्यापेक्षा भव्य सभा आयोजित करणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. अजित पवार यांना वेळ मिळाल्यास 27 ऑगस्ट रोजी जाहीर सभा होणार असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे पुण्यातील अजित पवार गटाचे सर्व कारकर्ते जोमाने कामाला लागले आहेत.